तुमच्या मुलांना बोर्डाच्या परीक्षेचं टेन्शन आलंय? कशी कराल त्यांची तयारी

दहावी-बारावीत शिकणाऱ्या मुलांवर अभ्यासाचा ताण वाढला.
parenting tips how to help your child for board exams
parenting tips how to help your child for board examsesakal
Summary

दहावी-बारावीत शिकणाऱ्या मुलांवर अभ्यासाचा ताण वाढला.

दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांच्या (Board Exams) तारखा जाहीर झाल्या आहेत. अर्थात, दहावी-बारावीत शिकणाऱ्या मुलांवर अभ्यासाचा ताण (Pressure) वाढला असेलच. या काळात त्याचे आई-वडीलही त्याच्याकडून खूप अपेक्षा ठेवतात आणि वेळोवेळी सर्व सूचनाही देतात. अशावेळी परीक्षेच्या दिवसात मुलाचा ताण अधिकच वाढतो.त्यामुळे पालकांनी हे करणं टाळणं गरजेचं आहे. त्याऐवजी मुलांना शिक्षण व टाइम मॅनेंजमेंट आदी सुविधा देण्यास मदत करून त्यांना योग्य गाइडलाइन्स करावीत. जेणेकरून परीक्षेच्या नावाखाली मुलांची अस्वस्थता दूर करता येईल. यासाठी काही गोष्टींची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे.

parenting tips how to help your child for board exams
दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांनो परीक्षेचं टेन्शन नका घेऊ; शिक्षक सांगतायत टिप्स

मुलावर जास्त दबाव टाकणे योग्य नाही-

प्रत्येक मुलाची विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता प्रत्येक विषयानुसार वेगवेगळी असते. सतत वाचत राहण्यासाठी आपण त्यांच्यावर दबाव आणू नये. यामुळे परीक्षेबाबत त्यांना आधीपासून असलेले टेन्शन आणखी वाढते. सर्व मुलांचा स्वत:चा शिकण्याचा वेग असतो. मुलांच्या क्षमतेवर विश्वास ठेवायला शिका. तरच तो आपली क्षमता ओळखेल आणि तरच त्याचा खरा विकास होईल. त्यामुळे परीक्षेच्या वेळी मुलावर अभ्यास करण्यासाठी जास्त दबाव टाकू नका.

दुसऱ्यांसोबत तुलना करणे बंद करा-

मुलांवर अनेकदा मार्क्सबद्दल प्रश्न विचारला गेला किंवा इतर मुलांशी नकारात्मक पद्धतीने तुलना केली तर मूल निराश होऊ शकतं. परीक्षेचे गुण हा प्रत्येक गोष्टीचा निकष असू शकत नाही. प्रत्येक मुलाची स्वतःची क्षमता असते. एखाद्या विषयात पूर्ण गुण मिळवलेले मूल इतर सर्व विषयातही पारंगत असण्याची गरज नाही. म्हणून आपल्या मुलाची वैशिष्ट्ये समजून घ्या आणि त्यावर विश्वास ठेवा.

parenting tips how to help your child for board exams
बारावीच्या परीक्षेचं काय होणार? विद्यार्थी-पालकांचा जीव टांगणीला

मुलाशी संवाद साधा-

परीक्षेच्या वेळी मुलांशी वेळोवेळी बोलून त्यांच्या समस्या सोडवण्यास मदत करा. फक्त त्याचा कोणताही प्रश्न टाळू नका. त्याला चुकीचे सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका. त्याऐवजी, आपल्या मुलांच्या प्रत्येक समस्येचे निराकरण करण्यासाठी त्यांचे सहकारी व्हा. यामुळे मुलांची तयारी तर सुधारेलच शिवाय त्यांच्यातील समस्या सोडवण्याचे कौशल्यही विकसित होईल.

त्यांच्या अभ्यासाचीही तितकीच काळजी घ्या-

आपले मूल काय आणि कसे वाचत आहे ते पहा. परीक्षेच्या तारखांनुसार तुमच्या मुलाचं अभ्यासाचं टाइमटेबल योग्य आहे ना, याची खात्री करून घ्या. परीक्षेच्या दोन-चार दिवस आधी त्याला सगळी तयारी करायला लावल्यावर त्याच्यावरील दडपण वाढतं. त्यामुळे त्याला वेळापत्रक ठरवायला मदत करा. जेणेकरून परीक्षेपूर्वी मुलालाही रिव्हाईज करायला वेळ मिळेल.

पौष्टिक आहारही आवश्यक -

परीक्षेची तयारी करताना मुलांच्या आहारातील पोषणाची विशेष काळजी घ्यायला हवी. त्यांना यावेळी ड्रायफ्रुट्स आणि ताज्या हिरव्या भाज्या आणि फळे यासारख्या पोषक-समृद्ध खायला दिलं पाहिजे. जेणेकरून त्यांचे आरोग्यही निरोगी राहील आणि परीक्षेदरम्यान एकाग्रताही राखली जाईल.

मुलांना अभ्यास करताना थोडा वेळ विश्रांती देणंही गरजेचं आहे. त्यातून त्यांना पुन्हा फ्रेश वाटू शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com