Pregnancy Care : नॉर्मल प्रसुतीसाठी फायदेशीर आहेत ही योगासने, प्रत्येकीने करायलाच हवीत!

बटरफ्लाय योगा केल्याने बाळाच्या पोषणासाठी मदत होते
Pregnancy Care
Pregnancy Care esakal

Pregnancy Care :

घरात बाळाची चाहुल लागली की घरातलं वातावरण बदलून जातं. आनंदोत्सवासोबतच गरोदर सुनेची, पत्नीची काळजी घेतली जाते. त्यासाठी घरातील वृद्ध महिला गरोदर स्त्रीला काही सोपी पण व्यायाम होतील अशी कामे सांगतात. तर, डॉक्टर तिला योगासने करायला सांगतात.

गरोदरपणात काही योगासने करणे फायद्याचे ठरते. कारण, आजकाल सिझेरियन प्रसुतीची प्रकरणे वाढली आहेत. काहीतरी अडचणी येतात अन् सिझेरियनचा निर्णय घ्यावा लागतो. त्यामुळेच गरोदर महिलेने काही योगासने केली तर नॉर्मल प्रसुती होण्यास मदत होते.

Pregnancy Care
Yoga For Blood Pressure : उच्च रक्तदाबाच्या समस्येपासून सुटका हवी आहे? मग, रोज करा ‘ही’ योगासने

बटरफ्लाय

गर्भधारणेदरम्यान बटरफ्लाय योगा केल्याने बाळाच्या पोषणासाठी गर्भाशयाला रक्तपुरवठा होण्यास मदत होते. योगाची ही पोझ करण्यासाठी आसन करण्यासाठी बेडवर सरळ बसा आणि दोन्ही पायांचे गुडघे आतील बाजूस वाकवा. आता दोन्ही पायांचे तळवे एकत्र जोडून दोन्ही हातांनी पाय धरा. आता मांड्या हलवा. याला बटरफ्लाय पोज म्हणतात.

त्रिकोणासन

योग व्यायाम करण्यासाठी आधी सरळ उभे राहा आणि नंतर दोन पायांमध्ये थोडे अंतर ठेवा. त्यानंतर संपूर्ण शरीर डाव्या बाजूल झुकवा. आणि डावा हात तळव्याला टेकवा, तर उलट उजवा हात वरच्या दिशेला न्या.  

Pregnancy Care
Yoga Rules : स्वामी रामदेवांनी सांगितलेत प्राणायम करण्याचे काही खास नियम, तुम्हाला माहितीयेत का?

मलासन

या योग आसनाच्या सरावाने गर्भाशयाला रक्तपुरवठा होतो आणि प्रसूतीच्या वेळी कोणतीही अडचण येत नाही. हा योगाभ्यास करण्यासाठी आधी सरळ उभे राहा, त्यानंतर पायांमध्ये थोडे अंतर ठेवा आणि दीर्घ श्वास घेताना तुमचे शरीर उजव्या बाजूला वाकवा. त्यानंतर तुमचा डावा हात वरच्या दिशेने जोडा आणि तुमचे डोळे वर ठेवा. (Yoga for pregnancy)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com