Raksha Bandhan 2023 : लहान की मोठा भावंडामध्ये कोण असतं जास्त हुशार? 

भावा-बहिणीशी संबंधित या गोष्टी तुम्हाला नक्कीच माहिती नसतील?
Raksha Bandhan 2023
Raksha Bandhan 2023 esakal

Raksha Bandhan 2023 :  दुसऱ्या बाळाची चाहुल लागल्यावर सर्वात जास्त आनंद होतो तो त्या घरात असलेल्या पहिल्या बाळाला. याचे कारण म्हणजे, त्याच्यासोबत खेळायला, बोलायला, त्याचे सिक्रेट जपायला त्याला एक हक्काचा माणूस मिळणार असतो.

त्यामुळेच आईच्या पोटात असलेलं बाळ मुलगा असेल की मुलगी, ते कधी येणार, ते बाळ माझ्याशी खेळेल का? असे प्रश्न विचारून तो आईला भांभावून सोडत असतो.

घरात आलेलं बाळ कुटुंबातील सर्वांचीच मनं जपत असतं. तसेच, भाऊ-बहिणीचे नाते हे जगातील सर्वात प्रेमळ आणि अनोखे नाते आहे. यामध्ये एकमेकांबद्दल प्रेम आहे, तसेच त्या नात्यात भांडण आणि रूसवा फुगवाही आहे.

परिस्थिती कशीही असली तरी बहिण-भावातील प्रेम आंबट-गोड असतं. लवकरच रक्षाबंधन येणार आहे. त्यामुळेच आपण भावा-बहिणीच्या नात्यातील काही गुपित जाणून घेऊयात.  (Raksha Bandhan 2023)

Raksha Bandhan 2023
Rakshabandhan Review: 'रक्षाबंधन' पाहायला जातायं सोबत रुमाल हवाच!

मोठा की लहान कोण असंत जास्त हुशार?

घरात दोन मुलं असतील तर त्यापैकी एखादं जास्त हुशार असतं. तर दुसरं कमी असतं. असं का असतं. हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर, याचं उत्तर आज आम्ही तुम्हाला देतो. घरात असलेल्या मोठ्या भावंडाचा ‘आयक्यू’  छोट्यांपेक्षा अधिक असतो.

याच शास्त्रीय कारण तर माहीती नाही. पण, अशी मान्यता आहे की, घरात असलेली मोठी भावंड लहानग्यांसमोर एक आदर्श निर्माण करू इच्छित असतात. त्यामूळेच ते त्यांच्या नजरेसमोर चुका करत नाहीत.

घरातले इतर सदस्यही मग मोठ्या भावाकडून, बहिणीकडून शिक काहीतरी असे सांगतात. त्यामुळेच एक जबाबदारी म्हणून मोठी भावंड चुकत नाहीत. त्यामुळेच मोठ्या भावंडांचा आयक्यू चांगला असतो.  (Siblings)

Raksha Bandhan 2023
Rakshabandhan 2023 : डिजिटल युगातही टपालाचे महत्त्व कायम! भाऊरायापर्यंत राखी पोचवण्यासाठी बहिणींकडून पसंती

आई-वडिलांच फेव्हरेट कोण आहे?

घरात कितीही भावंड असली तरी त्यातील एखादंच त्यातील फेवरेट असतं. घरात तिन पोरं असली तर त्यातील मोठा किंवा छोटा हेच कुटुंबातील सदस्यांचे आवडते असतात.

कोण जास्त समजून घेणारं असतं?

तुमची मोठी बहिण असेल तर ती तुम्हाला जास्त समजून घेते. लहान भावाच्या अडचणी ती समजून घेते. त्याला योग्य सल्ला देते. तसेच, जर घरात मोठा भाऊ असेल तर तोही बहिणीच्या अडचणी समजून घेतो. लहान भावंडाला आई-वडिलांच्या रागापासूनही त्याचा बचाव करतात.

Raksha Bandhan 2023
Rakshabandhan 2023 : यंदा बाजारात खास ‘ईव्हील आय’ राखी! आकर्षण राख्यांनी बाजारपेठ फुलली

मुलं एकमेकांचा आधार बनतात

पालकांमध्ये खूप भांडण झाले तर त्याचा थेट परिणाम मुलांवर होतो. जरी हा परिणाम नकारात्मक आणि सकारात्मक असू शकतो. आई-वडिलांमध्ये खूप भांडण झाले तर भावंडांचे बंध खूप घट्ट होतात. कारण अशा परिस्थितीत भावंडांना असे वाटते की केवळ तेच एकमेकांसाठी मोठा आधार बनू शकतात.

  

ज्या घरात चिमुकल्यांची किलबिल असते तिथं घटस्फोट कमी होतात?

ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीने आपल्या एका अभ्यासात दावा केला आहे की ज्या जोडप्यांना मुले आहेत त्यांच्यात घटस्फोटाची शक्यता खूपच कमी आहे. याचे कारण असे की, मुलं आहेत म्हणून तुम्ही नातेसंबंध चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतात. ज्या काही समस्या उद्भवतील ते एक जबाबदार पालक म्हणून हाताळू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com