Relationship: काही लोक Extra Marital Affairs का करतात? हे तीन मोठे कारण आले समोर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

relationship tips

Relationship: काही लोक Extra Marital Affairs का करतात? हे तीन मोठे कारण आले समोर

लग्न आयुष्यातील असा टप्पा आहे यानंतर नवरा बायकोचं आयुष्य संपूर्णपणे बदलून जातं. लग्नानंतर नवरा बायकोचं नात हळूवारपण खूलतं. लग्नानंतर नवरा बायकोचं नातं विश्वास आणि प्रेमावर टिकतं. जर विश्वासात थोडी जरी कमतरता जाणवली तर मॅरिड लाइफमध्ये समस्या निर्माण होतात.

वैवाहीक आयुष्य हे त्यावेळी सर्वात जास्त कोलमडतं जेव्हा नवरा बायकोच्या नात्यात तिसऱ्याची एंट्री होते. काही लोक तर एक्सट्रा मॅरिटल अफेयर्स मध्ये इन्वॉल्व होतात. पण तुम्हाला माहिती आहे का काही लोक Extra Marital Affairs का करतात? आज आपण या मागील कारणे जाणून घेणार आहोत. (Relationship tips why married people having Extra Marital Affairs read shocking reasons)

अटेंशनची कमतरता
महिला असो की पुरुष लग्नानंतर त्यांच्या आयुष्यात लाइफ पार्टनरची इन्वॉल्वमेंट नसेल तर त्यांना एकटेपणाची भावना येते. यात विशेषत: पार्टनरकडून अटेंशन न मिळणे हे Extra Marital Affairsचे सर्वात मोठे कारण असते.

पार्टनरची अशी इच्छा असते की त्यांच्या प्रत्येक कामाची प्रशंसा करावी. जर त्यांच्याकडे विशेष लक्ष दिले नाही तर त्यांच्यातील आत्मविश्वास मंदावतो. अशात ते आपला आनंद दुसऱ्या ठिकाणी शोधतात आणि Extra Marital Affairsची सुरवात होते.

हेही वाचा: Healthy Lifestyle: ब्रेकफास्टमध्ये करा 'हे' पाच बदल; पोट दिसेल एकदम फ्लॅट

इमोशनल सपोर्ट न मिळणे
जेव्हा माणूस लग्नबंधनात अडकतो, तेव्हा सुरवातीला सर्व मजेत असतं. नवरा-बायको एकमेकांसाठी जीव पण देण्याची भाषा करतात. मात्र जसं जसं नातं जुनं होत जातं तसं तसं इमोशनल अटॅचमेंट कमी होत जाते.

अनेकदा कठीण प्रसंगी माणसाला आपल्यालाही कोणी पँपर करावं अशी इच्छा होते त्यासाठी तो लाईफ पार्टनरजवळ जातो मात्र तिथे हवी ती प्रतिक्रिया मिळत नाही. अशावेळी तो इमोशनल सपोर्टसाठी कोणत्या ना कोणत्या व्यक्तीला शोधून काढतो.

हेही वाचा: Relationship Tips : वैवाहिक आयुष्यासाठी उत्तम आहेत या ६ लैंगिक स्थिती

वैवाहीक आयुष्यात कटूपणा
वैवाहीक आयुष्यात लोक एक्स्ट्रा अफेयरमध्ये यामुळे पडतात कारण त्यांची मॅरीड लाइफ उत्तम सुरू नसते. नात्यात कटूपणा आल्यानंतर ते चांगलं आयुष्य कसं जगावं, यासाठी धडपडत असतात. नवरा बायकोच्या नात्यात लहान मोठे वाद होत असतात मात्र याचा विपरीत परीणाम होऊ नये, याची खबरदारी घेणे आवश्यक आहे