
या प्रमाणपत्राद्वारे मिळवा सरकारी नोकरीत आरक्षण
मुंबई : आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्यांसाठी सरकार विविध योजना राबवत असते. त्यापैकीच एक म्हणजे EWS certificate. याद्वारे उच्च शिक्षणासाठी सरकारी अर्थसाहाय्य मिळते. तसेच सरकारी नोकऱ्यांमध्ये १० टक्के आरक्षण मिळते.
हेही वाचा: आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्यांना जाहीर केलेले आरक्षण मिळणारच
EWS certificate म्हणजे काय ?
या प्रमाणपत्रामुळे खुल्या वर्गातील नागरिकांनाही आरक्षणाचा लाभ घेता येतो. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी सरकारी अर्थसाहाय्य मिळते. तसेच सरकारी नोकऱ्यांमध्ये १० टक्के अर्थसाहाय्य मिळते. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी असेल आणि ५ एकरपेक्षा कमी जमीन असेल अशा कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळू शकतो.
हेही वाचा: आर्थिक मागास विद्यार्थ्यांसाठी मुंबईत वसतीगृह
EWS certificate कसे मिळवावे ?
सर्वात आधी ईडब्ल्यूएस अर्ज डाऊनलोड करावा. पूर्ण भरलेला अर्ज आवश्यक कागदपत्रांसह एसडीएम ऑफिसमध्ये जमा करावा. तिथे अर्जाची तपासणी केली जाईल आणि त्यानंतर तुम्हाला ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र दिले जाईल.
हेही वाचा: आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी गणवेश
EWS certificateसाठी आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
पॅन कार्ड
अधिवास प्रमाणपत्र
जातीचा दाखला
एम्प्लॉयमेंट सर्टिफिकेट
उत्पन्नाचा दाखला
पासपोर्ट साइज फोटो
भ्रमणध्वनी क्रमांक
Web Title: Reservation In Govt Service By Ews Certificate How To Make Ews Certificate
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..