Resolve Fighting in Relationship: तुमचं नातंही झालंय का Tom & Jerry सारखं; या टिप्स करतील All Is Well

How to Handle Relationship Arguments: जोडीदारासोबतच भांडण मिटवणं खरचं सोप्पय ओ
Resolve Fighting In A Relationship
Resolve Fighting In A Relationshipesakal

How to Handle Relationship Arguments : प्रत्येकाच्या वैवाहिक आयुष्यात कधी ना कधी असा टर्न येतो की तेव्हा जोडीदाराचे तोंडही पहावे वाटत नाही. जेव्हा किरकोळ कारणे संपतात. तेव्हा खऱ्या भांडणाला सुरूवात होते आणि एकमेकांच्या प्रेमात असलेले ते दोघे एकमेकांचे वैरी होतात.

जेव्हा नात्यात अशी परिस्थिती येते. तेव्हा आपण आपल्या नात्याची सुंदर भावना प्रेम विसरायला लागतो. या भांडणांमुळे तुम्ही दूर जाऊ शकता, पण मग तुम्हाला या छोट्या छोट्या लढायांचा पश्चाताप होतो. तुम्हाला तुमच्या जोडीदाराची आठवण येऊ लागते. पण काही वेळा या छोट्या छोट्या भांडणांमुळे नाती बिघडू शकतात.

Resolve Fighting In A Relationship
Relationship Tips : सेक्सचा हा फंडा माहीत असेल तर कमी वेळ देऊनही पार्टनर होणार नाही नाराज

तुमच्या नात्यातही असंच सुरू आहे का? जोडीदाराला भेटल्यावर अनेकदा तुमचे भांडण होते का किंवा तुम्ही एकमेकांशी उद्धटपणे बोलता का? जर तुमच्या नात्यात असं होऊ लागलं असेल तर वेळीच काही सोप्या टिप्स चा अवलंब करून तुम्ही या भांडणापासून दूर राहून आपलं नातं वाचवू शकता. जाणून घेऊयात नात्यातील वाद संपवण्याच्या काही टिप्स

जोडीदाराशी बोला


जोडीदाराशी गप्पा मारल्याने तुमच्यातील अनेक समस्या दूर होऊ शकतात. कदाचित सततच्या भांडणांमुळे त्यांना तुमच्याशी बोलायचं नसतं. त्यामुळे त्यांच्यासाठी छोट्या छोट्या गोष्टींसाठी वेळ काढा. आपण फिरायला जाऊ शकता आणि वाटेत आपल्या भावना बोलण्यात ठेवू शकता किंवा त्यांचे मन समजू शकता.

Resolve Fighting In A Relationship
Long Distance Relationship: तु तिथे अन् मी इथे; Long Distance प्रेमातला गोडवा कसा वाढवावा?
जोडीदाराशी बोलून सगळेच प्रॉब्लेम सुटू शकतात
जोडीदाराशी बोलून सगळेच प्रॉब्लेम सुटू शकतात esakal

सुरूवात तुम्ही करा

एखाद्या गोष्टीवरून जर तुमच्या दोघांमध्ये भांडण झालं तर एकमेकांची समजूत काढण्याची वाट पाहण्यापेक्षा एकत्र बसून ते प्रकरण सोडवा. गोष्टी वेळेवर सोडल्यास नात्यात आणखी अडचणी वाढू शकतात.

त्यांना तुमच्याबद्दल काय आवडले नाही आणि कशामुळे तुम्हाला राग आला हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून पुढच्या वेळी अशा गोष्टी रिलेशनशीपमध्ये येऊ देऊ नका.

शांत रहा

कधीकधी तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या बोलण्यावरून वाईट वाटू शकतं, पण रागाच्या भरात प्रतिसाद देण्यापेक्षा गप्प बसणंच चांगलं.

आपल्या जोडीदाराने नकळत किंवा आपल्या भावना दुखावू नयेत या हेतूने असे म्हटले असेल, परंतु त्या वेळी जर आपण रागाने प्रतिक्रिया दिली तर परिस्थिती बिघडू शकते. अशा वेळी प्रकरण बदलून इतर काही गोष्टी करा.

Resolve Fighting In A Relationship
Physical Relation : शारीरिक संबंध कंटाळवाणे होत असतील तर ट्राय करा आंधळी कोशिंबीर

प्रेमानं वागणं सुरू ठेवा

जोडीदारामध्ये वाद झाल्यानंतर ते बोलणं बंद करतात. तुमच्याशी प्रेमानं वागण बंद करतात. पण, कितीही वाद विवाद किंवा भांडण झाले तरी त्यांच्याबरोबर आपला दैनंदिन दिनक्रम किंवा पूर्वनियोजित कार्यक्रम तसाच सुरू ठेवा.

भांडणानंतरही त्यांना पूर्वीसारखाच गुड नाईट म्हणा, त्यांच्या मिठीत जा, त्यांच्योसोबत एकत्र जेवण चहा-नाश्ता करा.

वेळ द्या

अनेकदा भांडणे एकमेकांना वेळ न दिल्याने किंवा संभाषण न झाल्यामुळे होतात. त्यामुळे जोडीदारासोबत वेळ घालवा. हल्ली अनेकदा असं होतं की जोडपी एकत्र असतात पण त्यांचा वेळ एकतर इतरांसोबत फोनवर मेसेज आणि कॉलवर किंवा इतर काही गोष्टींमध्ये घालवला जातो. पण जेव्हा तुम्ही एकमेकांसोबत असता तेव्हा प्रत्येक क्षणाचा मनमोकळेपणाने आनंद घ्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com