Pregnancy: ना गर्भनिरोधक गोळ्या, ना कंडोम! 'या' नैसर्गिक मार्गाने टाळू शकता गर्भधारणा

नैसर्गिकरित्या गर्भधारणा रोखण्यासाठी 'रिदम मेथड'चा वापर केला जाऊ शकतो.
Rhythm method for birth control
Rhythm method for birth control Sakal

Rhythm method for birth control: आई होणं हे प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असलं तरी काही वेळा काही कारणांमुळे महिलांना गर्भधारणा टाळावी लागते. गर्भधारणा टाळण्यासाठी इच्छा नसतानाही स्त्रिया गर्भनिरोधक गोळ्या घेतात. परंतु गर्भधारणा टाळण्यासाठी तुम्ही फक्त गर्भनिरोधक गोळ्याच घ्याव्यात असे नाही. आपण गर्भधारणा टाळण्यासाठी काही नैसर्गिक पद्धती देखील वापरू शकता. त्यामुळे तुम्हालाही आता आई व्हायचं नसेल तर यासाठी आम्ही तुम्हाला एक नैसर्गिक उपाय सांगणार आहोत. नैसर्गिकरित्या गर्भधारणा रोखण्याच्या या पद्धतीला 'रिदम मेथड' म्हणतात.

'रिदम मेथड' म्हणजे काय?

रिदम मेथडला कॅलेंडर पद्धत देखील म्हणतात. रिदम मेथड हा गर्भधारणा टाळण्याचा एक मार्ग आहे. यामध्ये स्त्रीला त्यांच्या मासिक पाळी (मेंस्ट्रुअल सायकल) आणि प्रजनन क्षमतेच्या (फर्टिलिटी) कालावधीचा मागोवा घेणे आवश्यक आहे. स्त्रिया महिन्याच्या काही दिवसांमध्ये सर्वात जास्त प्रजननक्षम (फर्टाइल) असतात, म्हणजेच त्या वेळी गर्भधारणेची शक्यता खूप जास्त असते.

Rhythm method for birth control
उशिराने गर्भधारणा करायची असल्यास egg fridging आवश्यक

जर तुम्हाला गर्भवती व्हायचे नसेल, तर तुम्ही जास्त प्रजननक्षम काळात (फर्टाइल) असताना सेक्स करणे टाळावे. अनेक स्त्रिया या कालावधीतही लैंगिक संबंध ठेवतात. परंतु या दिवसांत गर्भधारणा टाळण्यासाठी त्या गर्भनिरोधक गोळ्या घेतात.

रिदम मेथडमध्ये स्त्रीला तिचे ओव्युलेशन कधी होणार आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे असते. मासिक पाळीत ओव्युलेशन ही अशी वेळ असते जेव्हा तुमच्या अंडाशयातून अंडी बाहेर पडतात. या काळात सेक्स केल्याने शुक्राणूंनी अंडी फलित होऊ शकतात, ज्यामुळे स्त्रिया गर्भवती होऊ शकता.

रिदम मेथड कशी कार्य करते?

  • प्रत्येक महिन्यात असे काही दिवस असतात ज्या दरम्यान महिला प्रजननक्षम (फर्टाइल) असतात. अशा स्थितीत रिदम मेथडचा वापर करणाऱ्या महिलांना महिन्यातील कोणते दिवस प्रजननक्षम असतील हे जाणून घेण्यासाठी त्यांची शेवटची मासिक पाळी येण्याच्या वेळेवर लक्ष ठेवावे लागते.

  • एकदा फर्टाइल दिवस लक्षात आले की, महिला या काळात लैंगिक संबंध ठेवायचे की नाही हे ठरवू शकतात. ज्यांना गरोदर राहायचे नाही, त्या या काळात कंडोम वापरू शकतात.

Rhythm method for birth control
PCODमुळे गर्भधारणा का होत नाही? जाणून घ्या कारणे
  • असे अनेक मार्ग आहेत ज्याद्वारे महिला त्यांच्या फर्टिलिटीवर लक्ष ठेवू शकतात. साधारणपणे, महिलांना 28 दिवसांच्या अंतराने मासिक पाळी येते, परंतु कधीकधी हा कालावधी 21 ते 35 दिवसांचा असू शकतो.

  • बर्‍याच महिलांना दर महिन्याला 28 दिवसांच्या अंतराने मासिक पाळी येते, तर अनेक महिलांना मासिक पाळी वेगवेगळ्या वेळी येते.

  • अनेक स्त्रियांना ओव्युलेशननंतर १४ ते १६ दिवसांच्या आत मासिक पाळी येऊ लागते. अशा परिस्थितीत, तुमची ओव्हुलेशन कधी होते हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल, तर तुमची मासिक पाळी सुरू होण्याच्या 14 दिवस आधी मोजा. याच्या मदतीने तुम्हाला समजेल की तुमचे ओव्युलेशन दर महिन्याला कधी होते.

  • तथापि, अंडी अंडाशयातून बाहेर पडल्यानंतर केवळ 12 तासांसाठी गर्भाधानेसाठी उपलब्ध असतात. महिलांच्या शरीरात शुक्राणू काही दिवस राहतात. अशा परिस्थितीत, रिदम मेथड वापरणाऱ्या महिलांना ओव्युलेशनच्या तीन दिवस आधी आणि त्यानंतर तीन दिवस लैंगिक संबंध न ठेवण्याचा सल्ला दिला जातो.

  • ज्या महिलांना दर महिन्याला नियमित मासिक पाळी येते त्यांच्यासाठी रिदम मेथड खूप प्रभावी आहे. यामुळे केव्हा ओव्हुलेशन होईल आणि फर्टिलिटी विंडो कधी उघडेल हे जाणून घेणे खूप सोपे होते.

  • यासाठी तुम्ही वापरू शकता अशी अनेक वेगवेगळी अॅप्स देखील आहेत. जसे- माय कॅलेंडर, पीरियड ट्रॅकर, ओव्युलेशन कॅल्क्युलेटर.

Rhythm method for birth control
मुलींचं लग्न २१ वर्षे वयानंतर झाल्यास गर्भधारणा-गर्भपातावर काय परिणाम होतो

रिदम मेथडचे फायदे:

रिदम मेथडचा एक फायदा असा आहे की हे पूर्णपणे मोफत आहे आणि यासाठी तुम्हाला डॉक्टरकडे जाण्याची किंवा कोणत्याही प्रकारचे औषध घेण्याची गरज नाही. तसेच, भविष्यात गर्भधारणेचा विचार केला तरीही तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. याशिवाय, या पद्धतीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे गर्भनिरोधकांच्या इतर पद्धतींच्या तुलनेत याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.

कुटूंबनियोजनाच्या इतर पद्धतींचे दुष्परिणाम:

  • मूड स्विंग

  • थकवा

  • उलट्या होणे

  • डोकेदुखी

  • हाडांमध्ये वेदना

  • ओवेरियन सिस्ट

  • रक्तदाब वाढणे

  • योनीतून स्त्राव आणि खाज सुटणे

  • ऍलर्जीक रिअॅक्शन

  • भविष्यात गर्भधारणा होण्यात अडचण

Rhythm method for birth control
गर्भधारणा आणि प्रसूती सुलभेतेसाठी 'ही' घ्या काळजी...

रिदम मेथडचे तोटे:

रिदम मेथडचा सर्वात मोठा तोटा म्हणजे गर्भनिरोधकांच्या इतर पद्धतींपेक्षा ती खूपच कमी प्रभावी आहे. रिदम मेथडचा अयशस्वी होण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. या पद्धती दरम्यान, कधी तुम्ही सर्वात जास्त प्रजननक्षम अर्थात फर्टाइल कधी असता हे जाणून घेणे फार कठीण होते. अशा परिस्थितीत महिलांना सतत याचाच विचार करावा लागतो. तसेच, रिदम मेथड लैंगिक संक्रमित रोगांपासून संरक्षण प्रदान करत नाही. रिदम मेथड फक्त अशा लोकांसाठी योग्य आहे, ज्यांचे फक्त एकाच व्यक्तीशी शारीरिक संबंध आहेत. तसेच, या पद्धतीमध्ये, तुम्हाला तुमची मासिक पाळीचे दिवस, ओव्हुलेशन आणि फर्टिलिटी विंजो खिडकीकडे खूप लक्ष देणे आवश्यक आहे.

कोणत्या महिलांसाठी रिदम मेथड फायदेशीर आहे?

  • मासिक पाळी नियमित येणाऱ्या महिलांना याचा फायदा होऊ शकतो.

  • ज्या महिला आपली मासिक पाळी, ओव्युलेशन आणि फर्टिलिटी दिवसांचा चांगल्या प्रकारे मागोवा ठेऊ शकतात, त्यांच्यासाठी रिदम मेथड फायदेशीर ठरू शकते.

  • ज्या स्त्रियांना आपण गर्भवती झालो तरी काही फरक पडणार नाही, अशा महिलांसाठी ही पद्धत फायदेशीर ठरू शकते.

गर्भधारणा टाळण्यासाठी रिदम मेथड किती प्रभावी?

  • गर्भधारणा रोखण्यासाठी ताल पद्धत किती प्रभावी ठरेल, हे काही गोष्टींवर अवलंबून आहे

  • तुमची मासिक पाळी दर महिन्याच्या नियमित तारखेला येते की नाही.

  • आपण ओव्हुलेशन किती अचूकपणे सांगू शकता?

  • ओव्हुलेशनचा अंदाज लावण्यासाठी वापरलेली साधने

टीप: ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com