- पृथा वीर
साडी हे केवळ एक वस्त्र नाही तर भारतीय संस्कृती आणि परंपरेचा साजेसा वारसा आहे. साडी म्हणजे स्त्रीत्वाचे अजोड दर्शन. साडी हे वस्त्र असे आहे, की त्यावर कितीही लिहिले तरीही कमीच आहे. भारतीय साड्या एक्सप्लोर करताना अजूनच उत्साह येतो. प्रत्येक राज्याची स्वतंत्र साडी आणि साडी नेसण्याची पद्धत निराळी. म्हणूनच नुकताच, २१ डिसेंबरला ‘साडी दिन साजरा झाला.