Rowing Exercise : एक स्टेप अन् परफेक्ट बॉडी शेप! हेच शिल्पाच्या स्लीम फिरगचं सीक्रेट

अभिनेत्री शिल्पाने शरीरातील सात मोठ्या मसल्सची नावं सांगत निरोगी आरोग्याचा फिटनेस मंत्रा सांगितला आहे
Rowing Exercise
Rowing Exerciseesakal

Rowing Exercise : आपल्या शरीरात अनेक छोटे मसल्स असतात. जे तुमच्या बॉडीला मूव्ह करण्यास मदत करतात. तेव्हा या मसल्सना कमकुवत होण्यापासून वाचवण्यासाठी त्याला हेल्दी ठेवणं फार महत्वाचं आहे. तसेच शरीराच्या मोठ्या मसल्सची काळजी घेणं फार महत्वाचं आहे. अभिनेत्री शिल्पाने शरीरातील सात मोठ्या मसल्सची नावं सांगत निरोगी आरोग्याचा फिटनेस मंत्रा सांगितला आहे.

शिल्पा शेट्टीनं बॉडीच्या सात मोठ्या मसल्सची नावं सांगत त्याला निरोगी ठेवण्याच्या एक्सरसाइजही सांगितल्या आहेत. ज्याचं नावं रोइंग एक्सरसाइज आहे. चला तर रोइंग एक्सरसाइजचे फायदे जाणून घेऊया. (Physical Fitness)

शिल्पा शेट्टीनं रोइंग एक्सरसाइजला खालील 7 मेजर मसल्सना मजबूत करण्यासाठी बेस्ट असल्याचं सांगितलं आहे. त्यानुसार मसल्ससाठीची प्रत्येक स्टेप फायदेदायी आहे.

Rowing Exercise
Shilpa Shetty : शिल्पा देतेय रेड अलर्ट, पाहा फोटो...

1) क्वाड्स

2) काल्फ

3) ग्लूट्स

4) चेस्ट

5) बँक

6) बॅक

7) आर्म्स

या मशिनवर एक्सरसाइज करते शिल्पा शेट्टी

रोइंग एक्सरसाइज अनेक प्रकारच्या मशीनवर केली जाते. त्यापैकी शिल्पा शेट्टी कुंद्रा फ्लायव्हील रोइंग मशीनवर व्यायाम करताना दिसत आहे. या मशीनमध्ये पंखा आहे, ज्याचा वेग रोइंग व्यायाम अधिक प्रभावी बनविण्यात मदत करतो.

शिल्पा शेट्टीची फूल बॉडी वर्कआउट एक्सरसाइज

रोइंग व्यायाम हा संपूर्ण शरीराचा कसरत करण्यासाठीचा व्यायाम आहे. ज्याचा तुमच्या खालच्या शरीरावर तसेच वरच्या शरीरावर परिणाम होतो. अमेरिकन फिटनेस प्रोफेशनल्स असोसिएशनच्या मते, रोइंग व्यायाम पायांमधील 65-75 टक्के स्नायू आणि 25-35 टक्के कोर काम करतात.

हृदय आणि फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी फायदेदायी

रोइंग व्यायाम हा कार्डिओ वर्कआउटचा एक भाग मानला जातो. ज्यामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढते. या वैशिष्ट्यामुळे हा व्यायाम हृदय आणि फुफ्फुसांना निरोगी बनविण्यात खूप मदत करतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com