Shoe Cleaning Tips: तुमचे कळकटलेले शूज चमकवतील या 5 सोप्या टिप्स! | Shoe Cleaning Tips: shoe cleaning tips and tricks how to clean your shoes at home | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shoe Cleaning Tips

Shoe Cleaning Tips: तुमचे कळकटलेले शूज चमकवतील या 5 सोप्या टिप्स!

Shoe Cleaning Tips: व्हाईट शूज जेवढे आपल्या लूकवर कूल दिसतात तेवढेच ते स्वच्छ करणे खूप अवघड होऊन जाते. असे शूज पांढरेशुभ्र असल्यामुळे लवकर खराब असतात किंवा छोटासा डागसुद्धा लवकर दिसून येतो. इतर रंगाचे शूज डागाळले तर त्याकडे इतके लक्ष जात नाही जेवढे व्हाईट शूज खराब झाल्यावर जाते.

जोपर्यंत व्हाईट शूजवरचा डाग काढला जात नाही तोपर्यंत ते स्वच्छ दिसत नाहीत आणि पर्यायाने आपण वापरूही शकत नाही. आज आम्ही तुम्हाला अशा काही टीप्स देणार आहोत ज्या फॉलो करुन आपण आपले पांढरे शूज अगदी सहज स्वच्छ करु शकतात. हो, या टीप्समुळे आपले शूज पुन्हा नव्यासारखे दिसू लागतील. 

पावसाळ्यात शूज स्वच्छ ठेवणे कठीण असते, विशेषतः पांढरे शूज. शूजचे फॅब्रिक सहजपणे धुतात, परंतु चिखल आणि डाग काढणे थोडे कठीण आहे. पाऊस पडला की पांढरे शूज वाचवण्यासाठी इतर रंगांचे शूज घालता येतात.

पण कधी कधी शाळा-कॉलेजात पांढऱ्या रंगाचा गणवेश घालायचा नियम असतो आणि मग पांढरे शूजच घालावे लागतात. म्हणूनच, आजच्या लेखात आम्ही तुम्हाला काही सोप्या घरगुती टिप्स सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही तुमचे पांढरे शूज चमकवू शकता.

पांढरे शूज स्वच्छ करण्याचे 5 सोप्या टिप्स

मीठ आणि लिंबू

एका भांड्यात कोमट पाणी घ्या आणि त्यात थोडे मीठ आणि लिंबाचा रस घाला. हे मिश्रण बुटाच्या पांढऱ्या कपड्यावर लावा आणि हलक्या हाताने स्वच्छ करा. नंतर स्वच्छ पाण्याने धुवा आणि वरचा पृष्ठभाग कोरडा होऊ द्या.

बेकिंग सोडा

थोडा बेकिंग सोडा घ्या आणि त्यात थोडे पाणी मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट शूजच्या डागांवर लावा आणि हळू हळू मसाज करा. यानंतर स्वच्छ पाण्याने धुवा आणि शूज कोरडे करा.

डिटर्जंट आणि टूथब्रश

कोमट पाण्यात थोडे डिटर्जंट घाला आणि हे मिश्रण बुटांच्या डागांवर लावा. नंतर मऊ टूथब्रश वापरून डाग हळूवारपणे स्वच्छ करा. लक्षात घ्या की तुमचा टूथब्रश नवीन आणि योग्य असावा. शूज स्वच्छ पाण्याने धुवा आणि वाळवा.

पांढरा व्हिनेगर

थोडे पांढरे व्हिनेगर घ्या आणि ते एका चिंधीत घाला. ही चिंधी शूजच्या पांढऱ्या कपड्यावर लावा आणि डाग घासून टाका. हळू हळू मसाज करा जेणेकरून व्हिनेगर पूर्णपणे बुटावर लागू होईल. नंतर स्वच्छ पाण्याने धुवा आणि शूज वाळवा.

नेल पेंट रिमूव्हर

तुम्ही कॉटनचा वापर करून शूजवर नेल पेंट रिमूव्हर लावू शकता आणि थोडा वेळ ठेवू शकता. यानंतर, आपण साबण आणि पाण्याने शूज धुवू शकता. या प्रक्रियेनंतर तुमचे शूज चमकदार दिसतील.

डिटर्जंट आणि ब्रश

पहिले थोड्या गरम पाण्यात डिटर्जंट टाकून ठेवावे. आपले शूज पांढर्‍या स्पंजने स्वच्छ पुसून घ्यावे आणि डिटर्जंटयुक्त पाण्यामध्ये भिजवून ठेवावे.  डिटर्जंटमुळे शूजवरचा सगळा मळ फुगतो, यामुळे शूज स्वच्छ करायला मदत होते.

महत्वाचे गोष्ट म्हणजे ही टेक्निक फॉलो केल्यामुळे शूजवर कायमस्वरूपी दिसणारे डाग नाही राहात. यानंतर ब्रशने सगळे डाग घासून स्वच्छ करा. खूप जास्त प्रेशर देऊन डाग घासले तर शूजची शाईन कमी होऊ शकते.

हे लक्षात ठेवा

  • शूज स्वच्छ करताना आपण जो साबण किंवा डिटर्जंट वापरतो तो जितका सॉफ्ट असेल तितके चांगले.

  • व्हाईट शूज नेहमी मोकळ्या हवेत आणि सूर्यप्रकाशात वाळवावे.

  • ब्लीचमुळे शूजची चमक वाढते. पाण्यामध्ये थोडेसे ब्लीच मिसळून शूजवर लावावे.

  • शूज जास्त घाण होईपर्यंत वाट बघू नका, ते लगेचच क्लिन करा