
Shraddha Walkar Murder Case : श्रद्धा वालकर, अनुपमा गुलाटी, नीतू सोलंकी, नैना साहनी यासह अनेक घटना अशा घडल्यात ज्यात एका पार्टनरचं आपल्या दुसऱ्या पार्टनरची क्रूर पद्धतीनं हत्या केली आहे. आता प्रश्न पडतो, कुठलंही नातं हे इतक्या टोकाला जातं की त्याची पूर्वकल्पना आपल्याला मिळू शकते का? किंवा नात्यात इतकं राक्षसी वागणं हे नव्यानंच असतं का? एखाद्या नात्यातला हिंसाचार, वाईट वागणं याची कुणकुण पार्टनरला आधीच मिळते का?
हेही वाचा: Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का?
याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉ. भालचंद्र काळमेघ यांच्या मते, नवीन नात्यातील व्यक्ती समजायला वेळ द्या. त्याचा स्वभाव, सवयी आपल्याशी जुळतात का हे बघणे गरजेचे आहे. नाते ताणले जात असेल तर, या परिस्थितीत घरच्या अनुभवी व्यक्तींशी बोलणे त्यांना विश्वासात घेऊन त्यांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
अशा परिस्थितीत टोकाची भूमिका घेणं टाळा. त्याऐवजी नात्यातील 'रेड फ्लॅग' वेळीच ओळखणे गरजेचे आहे. ‘पुढच्याला ठेच, मागचा शहाणा' या म्हणीप्रमाणे दुसऱ्याच्या अनुभवावरून शहाणपण घेणे अशा घटनामध्ये अत्यावश्यक असल्याचे काळमेघ म्हणाले. कुठल्याही Abusive किंवा Toxic Relationship मध्ये Red Flags लवकरात लवकर ओळखणे आणि Preventive Measures वेळीच घेणं महत्वाचं असल्याचा सल्ला डॉ. भालचंद्र काळमेघ यांनी दिला आहे.
Red Flags म्हणजे काय?
मानवी स्वभावाचे ४ प्रकार असतात, त्यातले अँटी सोशल बिहेविअर आणि बॉर्डर लाईन परन्सॅलिटी या दोन स्वभावाच्या व्यक्ती या कायम Abusive किंवा Toxic Relationship मध्ये अडकतात. अँटी सोशल बिहेविअर म्हणजे समाजविघातक कृत्यं आवडणं होय. या प्रकारच्या व्यक्तींना एखादं चुकीचं कृत्य केलं तरी वाईट वाटत नाही, दुसऱ्यांना त्रास देतानाही यांना कसलीच लाज वाटत नाही.
तर दुसरा प्रकार म्हणजे Border Line Personality. या प्रकारातील लोकांना जग फक्त ब्लॅक अँड व्हाईट दिसतं किंवा तेही तसेच असतात. एखादा माणूस हा तुकड्या तुकड्यात चांगला आणि वाईट असतो म्हणजेच ग्रे पर्सनलिटी यांना मान्य नसते. त्यामुळे या दोन्ही प्रकारातील लोक Risk Taking Behaviour साठी कायम तयार असतात.
उदाहरणार्थ कोणतीही जीवघेणी कृत्यं करताना ते मागे-पुढे पाहात नाहीत. त्यात अशा लोकांची नाती जास्त काळ टिकत नाहीत. एकूणच श्रद्धा वालकरप्रमाणे आपली अवस्था होऊ नये यासाठी वेळीच सावध होत रेड फ्लॅग ओळखणे आणि घरातील वरिष्ठांशी कायम संपर्कात राहणे आणि सतर्क राहाणे अत्यंत गरजेचे झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.