Shravan Special Diet मधुमेह नियंत्रणात ठेवायचाय? श्रावणातील आहारात ‘या’ पदार्थांचा करा समावेश

Shravan Special Diet For Diabetic Patients मधुमेहींना आपल्या डाएटमध्ये काही महत्त्वपूर्ण पदार्थांचा समावेश केल्यास काही महत्त्वपूर्ण पोषकघटकांचा शरीराला पुरवठा होऊ शकतो.
Shravan Special Diet
Shravan Special Diet Sakal

- डॉ. इरफान शेख

मधुमेहाची समस्या असणाऱ्या व्यक्तींनी आपल्या खाण्यापिण्याच्या वेळा कटाक्षाने पाळणे अतिशय गरजेचं असते. पण आहारात नेमक्या कोणत्या पदार्थांचा समावेश करावा, याबाबतही काही जणांचा गोंधळ उडताना दिसतो. पण काळजी करू नका, आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश केल्यास रक्तातील शर्करेची पातळी नियंत्रणात राहू शकते, याबाबत सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

Shravan Special Diet
मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी रोज इतके तास झोप महत्वाची

ताजी फळे

मधुमेह असणाऱ्यांनी आपल्या आहारात (diabetes diet food list in marathi) ताज्या फळांचा समावेश करावा. कारण फळांद्वारे शरीराला नैसर्गिक स्वरुपातील शर्करेचा पुरवठा होता. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण डाएटमध्ये पेर, संत्रे, ब्ल्यु-बेरीज्, सफरचंद, चेरी, प्लम्स, द्राक्षे, अव्हाकाडो, पेरू इत्यादी फळांचा समावेश करू शकता. या फळांमध्ये शरीरास आवश्यक असणारे पोषकघटक, फायबर, अँटी-ऑक्सिडंट्सचाही साठा असतो.

गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास यापैकी एखाद्या फळाचे आपण सेवन करू शकता. नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीने फळांचे सेवन आपण करू शकता. जसे की अर्धा वाटी ब्ल्यु-बेरीजमध्ये साखर नसलेले दही मिक्स करावे, फळांची स्मूदीही तयार करू शकता.

Shravan Special Diet
Diabetes Symptoms : सतत होणाऱ्या बद्धकोष्ठतेचे कारण असू शकतो मधुमेह?

सुकामेवा आणि चिया सीड्स

सुकामेव्यामध्ये मॅग्नेशिअम या पोषणत्त्वाचा मोठा साठा असतो. रक्तातील शर्करेची पातळी नियंत्रणात ठेवण्याकरिता आहारात बदाम, अक्रोड, काजू, पिस्ते यासारख्या सुकामेव्याचा समावेश करावा. सुकामेव्यामध्ये मोनोसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड्, प्रथिने आणि फायबर मुबलक प्रमाणात असतात.

ज्यामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. प्रवासादरम्यान शरीरातील ऊर्जा टिकून राहावी, याकरिता सकस आहाराचा (diabetes diet chart in Marathi) पर्याय म्हणजे सुकामेवा. तसंच चिया सीड्समुळेही रक्तातील शर्करा नियंत्रणात राहते व वजन देखील कमी होण्यास मदत मिळते.

Shravan Special Diet
Antidiabetic Plants : मधुमेह रोखण्याचे सामर्थ्य चारशे वनस्पतींमध्ये

कॅमोमाइल टी

कॅमोमाइल टी आरोग्यासाठी लाभदायक असते. यामध्ये अँटी- इंफ्लेमेटरी आणि अँटी- ऑक्सिडंट्सचे गुण असतात. हा चहा कॅमोमाइल नावाच्या फुलापासून तयार केला जातो. हा चहा बाजारात सहजासहजी उपलब्ध असतो. या चहातील घटक इंसुलिनची पातळी नियंत्रणात आणण्याचे कार्य करतात, म्हणूनच मधुमेहाचे रूग्ण हा चहा पिऊ शकतात.

तर मित्रांनो, या पदार्थांचा आहारात समावेश करून आपण आपल्या रक्तातील शर्करेची पातळी नियंत्रणात ठेवू शकता. पण तत्पूर्वी आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचाही सल्ला घ्यावा आणि आरोग्याच्या समस्या टाळण्यासाठी मधुमेहींनी श्रावणातील उपवासाच्या दिवसांतही आहाराचे काटेकोरपणे पालन करावे.  

 (लेखक अबॉट न्यूट्रिशनच्या मेडिकल अँड सायन्टिफिक अफेअर्स विभागाचे प्रमुख आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com