पॉर्न फिल्मला ‘ब्लू फिल्म’ का म्हणतात?

Story about why porn film called blue film
Story about why porn film called blue film

नागपूर :  तुम्ही ‘ब्लू फिल्म’ बघितली आहे का? होऽऽ होऽऽ ‘ब्लू फिल्म’... तुम्ही बरोबर ऐकलं... ‘काहीही प्रश्न विचारता राव’ असच काही म्हणाल, नाही का? ‘ब्लू फिल्म’ बघितली नाही असा व्यक्ती शोधूनही सापडणार नाही... अगदी शाळेत जाणाऱ्या मुलालासुद्घा ‘ब्लू फिल्म’ काय असते हे माहिती आहे. असच तुमच उत्तर असेल... तुमच म्हणण बरोबरही आहे. पण, तुम्ही पाहत असलेल्या अश्लील चित्रपटाला ‘ब्लू फिल्म’ का म्हणतात? असा प्रश्न कधी पडला का? नाही ना? कारण, आपण असे चित्रपट पाहण्याच इतके मग्न झालेले असतो की प्रश्न कधीच पडत नाही. चला तर आपण याची माहिती घेऊया...

चोरून-लपून ‘ब्लू फिल्म’ पाहणाऱ्यांची संख्या देशात मोठी आहे. कारण, आपल्या संस्कृतीत असे चित्रपट पाहणे चांगले समजले जात नाही. तरीही पाहणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. केंद्र सरकारने अशा अनेक साईट्सवर बंदीही घातली आहे. मात्र, कोणत्या ना कोणत्या माध्यमातून असे चित्रपट बघितलेच जातात. वयात आलेल्या मुलांचा यात मोठ्या प्रमाणात समावेश आहे.

मुलं असो किंवा मुली चोरून असे चित्रपट पाहत असतात. काही तर एकत्रच असे चित्रपट पाहत असतात. ‘ब्लू फिल्म’ बघणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने अत्याचार, बलात्कारच्या घटना वाढत आहेच. लहाण वयातच अशे चित्रपट बघितले जात असल्याने असे प्रकार मेठ्या प्रमाणात घडत आहे. मात्र, तुम्ही पाहत असलेल्या अश्लील चित्रपटाला ‘ब्लू फिल्म’ का म्हणतात असा प्रश्न कधीही पडला नसेल? पडला नसेल म्हणण्यापेक्षा तुम्ही याचा कधीही विचार केला नाही. मात्र, याची माहिती असणे गरजेचे आहे.

जगात हिंदुस्तान, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश म्हणजेच जवळपास दक्षिण आशियाई प्रदेशात ‘ब्लू फिल्म’ हा शब्द फक्त अश्लील चित्रपटांसाठी वापरला जातो. मात्र, या शब्दातून अश्लील चित्रपटाबद्दल काहीही सांगता येत नाही. तसेच काहीही सिध्द करता येत नाही. अशा स्थितीत अश्लील चित्रपटांना ‘ब्लू फिल्म’ का म्हणतात? असा प्रश्न पडतो.

अशा चित्रपटांना ‘ब्लू फिल्म’ असे नाव ठेवण्यामागील पहिले कारण असे म्हटले जाते की या चित्रपटांचे पोस्टर निळे किंवा स्काय ब्लू पार्श्वभूमीने बनविलेले आहेत. हा रंग खरोखरच का निवडला गेला हाही एक प्रश्न आहे. निळ्या रंगाचे पोस्टर्स चित्रपटाच्या पोस्टर्सच्या गर्दीत सहज लक्ष वेधतात, हे यामागील एक कारण आहे. मात्र, असे म्हणणे योग्य ठरणार नाही. कारण, विज्ञानाच्या मते सर्वांत लक्ष वेधून घेणारा रंग लाल आहे. अशा परिस्थितीत पोस्टर बनविताना निळा रंग देखील सर्वाधिक वापरला जातो. म्हणूणच या रंगासह इतर रंगांचा वापर करण्यास अधिक वाव आहे.

सुरुवातीला असे चित्रपट अत्यंत मर्यादित बजेटसह गुप्तपणे बनवली जात होते. पहिला अश्लील चित्रपट प्रसिद्ध झाला तेव्हा त्याचे नाव ‘ब्लू’ ठेवले होते. त्यानंतर त्यांना निळे चित्रपट म्हटले जाऊ लागले. मात्र, चित्रपटांच्या इतिहासात किंवा पॉर्न फिल्मच्या देशी-विदेशी इतिहासामध्ये अशा पदव्यांचा उल्लेख सापडत नाही. त्यामुळे याचे खरे कारण सांगता येणार नाही.

त्रपचिटांचे वर्गीकरण एक कारण

अश्लील चित्रपटांना निळे चित्रपट म्हणण्याचे कारणही चित्रपटांचे वर्गीकरण असू शकते. असे म्हटले जाते की एकेकाळी सर्व बी ग्रेड चित्रपट निळ्या कव्हरमध्ये पॅक करीत होते. पोर्न चित्रपटांचा देखील या वर्गात समावेश होता. म्हणून त्यांचे पॅकीट देखील निळे होते. जर आपण चित्रपटांच्या इतिहासाकडे आणि अभ्यासाकडे लक्ष दिले तर बी, सी, डी आणि ई ग्रेडचे चित्रपट देखील तयार केले जातात. परंतु, या चित्रपटांमध्ये पोर्नोग्राफीचा समावेश नाही.

स्वस्त आणि सुधारित उपाय

परिस्थितीचा परिणाम हेही एक कारण असू शकते. त्यावेळी या चित्रपटांमधील चित्रांची गुणवत्ता चांगली नव्हती. रंगीत चित्रपटांच्या अस्तित्वानंतरही या चित्रपटांमध्ये काळा आणि पांढरा रंगच दाखवला जात होता. नंतरच्या काळात अश्लील चित्रपट निर्मात्यांनी त्यांनाही रंगविण्यासाठी दबाव आणला असावा. आता त्यांच्याकडे पुरेसे बजेट नसल्याने काही चित्रपट निर्मात्यांनी काळ्या व पांढऱ्या रंगाच्या रीलचा प्रयोग करून ते रंगीबेरंगी करण्याचा प्रयत्न केला. आणि या प्रयत्नात तो प्रेक्षकांना काळ्या आणि पांढऱ्या निळ्या रंगात दाखवू शकला. हा एक स्वस्त आणि सुधारित उपाय होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com