
तुम्हाला जेवणानंतर आंघोळ करण्याची सवय आहे का ? बघा तज्ज्ञ काय सांगतायत
मुंबई : आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. अपर्णा पद्मनाभानी यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्या जेवणानंतर आंघोळ करण्याच्या सवयीबद्दल बोलत आहेत. ही सवय चुकीची असल्याचे त्या सांगत आहेत. त्यांनी म्हटले आहे की, ही कृती आयुर्वेदानुसार अस्वस्थ क्रियांपैकी एक आहे. ही सवय म्हणजे त्वचारोगाचे मुख्य कारण आहे.
हेही वाचा: शौचानंतर धुण्याची भारतीय पद्धत योग्य की पुसण्याची पाश्चात्य पद्धत ?
जेवल्यानंतर आपल्या शरीराचे तापमान २ अंशांनी वाढते. यामुळे पचन होण्यास मदत होते. पचनक्रिया सुरू असताना रक्ताभिसरणही चांगले होत असते.
हेही वाचा: हेल्थ वेल्थ : जेवणानंतर चालण्याचे फायदे!
डॉ. अपर्णा सांगतात की, आयुर्वेदानुसार जेवणानंतर आंघोळ केल्याने पचनक्रिया मंदावते. त्यामुळे शरीराला पुरेसे पोषण मिळू शकत नाही. परिणामी शरीरात अनेक समस्या उद्भवतात. याउलट, आंघोळीनंतर जेवल्याने पोटभर जेवले जाते.
हेही वाचा: जेवणानंतर चहा पिणं शरीरासाठी हानिकारक! जाणून घ्या
डॉ. अपर्णा सल्ला देतात की, जेवल्यानंतर २ ते ३ तास आंघोळ करू नये. तसेच नाश्ता केल्यानंतर १ तास आंघोळ करू नये.
Web Title: Taking Bath After Meal Good Or Bad Ayurveda Doctor Tips
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..