Places to Visit in Lucknow: लखनौमध्ये फिरण्यासाठी ही आहेत सुंदर ठिकाणे, एकदा नक्की भेट द्या

जर तुम्हाला कमीत कमी खर्चात उत्तम ट्रिप प्लॅन करायची असेल तर लखनौ तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो.
Lucknow
Lucknowsakal

पावसाळा सुरु झाला आहे. अशा परिस्थितीत अनेकजण आल्हाददायक वातावरणात प्रवास करण्याचा विचार करत आहेत. जर तुम्हाला कमीत कमी खर्चात उत्तम ट्रिप प्लॅन करायची असेल तर लखनौ तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो. तुम्ही कुटुंब आणि मित्रांसह या शहराला कुठे-कुठे भेट देऊ शकता हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

रुमी दरवाजा

रुमी दरवाजाला भेट दिल्याशिवाय लखनौची सहल अपूर्ण असल्याचे म्हटले जाते. 60 फूट उंचीचे हे प्रवेशद्वार सर्वांचे लक्ष वेधून घेते. रुमी दरवाजा हा लहान आणि मोठा इमामबारा यांच्या मध्ये आहे. ऐतिहासिक ठिकाणे आवडणाऱ्या लोकांसाठी हे एक चांगले ठिकाण आहे. हा दरवाजा 1784 मध्ये नवाब असफ-उद-दौला यांनी बांधला होता.

Lucknow
Lucknowsakal
Lucknow
Vastu Tips  : Money Plant लावताना या चूका टाळल्या तरच श्रीमंत व्हाल, नाहीतर...

ब्रिटिश रेसिडेन्सी

ब्रिटिश रेसिडेन्सीला रेसिडेन्सी कॉम्प्लेक्स असेही म्हणतात. ही इमारत एकेकाळी ब्रिटिश रेसिडेंट जनरलचे निवासस्थान म्हणून काम करत होती. १८व्या शतकात भारतीय बंडखोरी दरम्यान ३ हजाराहून अधिक ब्रिटिश रहिवाशांना येथे आश्रय देण्यात आला. आता ही इमारत पुरातत्व सर्वेक्षण अंतर्गत संरक्षित आहे, जिथे तुम्ही फिरायला जाऊ शकता. येथे प्रवेशासाठी कोणतेही शुल्क नाही.

Lucknow
Lucknowsakal

छत्तर मंझील

छत्तर मंझीलला अंब्रेला पॅलेस असेही म्हणतात. येथे एकेकाळी राज्यकर्ते त्यांच्या पत्नीसह राहत असत. येथे इमारतीला छत्रीच्या आकाराचे घुमट आहेत म्हणून त्याला छत्तर मंझिल असे म्हणतात. सुंदर वास्तुकला पाहण्यासाठी तुम्ही सोमवार ते शुक्रवार येथे भेट देऊ शकता.

sakal
sakal
Lucknow
Berry Orange Soda Recipe: पावसाळ्यात इन्फेक्शनपासून सुटका हवीये, मग स्ट्रॉबेरी आणि लिंबूपासून बनवा हे टेस्टी ड्रिंक
Lucknow
Lucknowsakal

जामा मशीद, लखनौ

लखनौच्या पर्यटन स्थळांच्या यादीत जामा मशिदीचे नावही समाविष्ट आहे. देशातील इतर सर्व मशिदींप्रमाणेच हे मुस्लिम भाविकांसाठी एक आध्यात्मिक केंद्र आहे आणि सुंदर वास्तुकलेचा नमुना देखील आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com