esakal | No Shave November: 'अशीच येत नाय रुबाबदार दाढी, त्यासाठी घ्यावी लागते मेहनत!'
sakal

बोलून बातमी शोधा

beard growth

बॉलिवूड चित्रपटामध्ये ऐकेकाळी खलनायकाच्या रुपात दाढीवाले दिसायचे. पण आता हिरोही रुबाबदार दाढीमध्ये दिसतात. परिणामी तरुणाईमध्येही दाढीबद्दल आकर्षण निर्माण झाल्याचे चित्र दिसते. नुसती दाढी वाढवून चालत नाही त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. जाणून घेऊयात Tips For Beard Growth... 

No Shave November: 'अशीच येत नाय रुबाबदार दाढी, त्यासाठी घ्यावी लागते मेहनत!'

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

सध्याच्या घडीला तरुणांमध्ये दाढी वाढवण्याची क्रेझ पाहायला मिळते. तुम्ही जर निरीक्षण केले असेल तर देशातील लोकप्रिय खेळ असलेल्या क्रिकेटच्या मैदानात भारतीय संघाचे नेतृत्व करणारा विराट कोहली, माजी कर्णधार धोनीसह संघातील इतर काही खेळाडूंमध्ये दाढी वाढवण्याची क्रेझ निर्माण झाल्याचे चित्र नक्कीच आठवेल.

बॉलिवूड चित्रपटामध्ये ऐकेकाळी खलनायकाच्या रुपात दाढीवाले दिसायचे. पण आता हिरोही रुबाबदार दाढीमध्ये दिसतात. परिणामी तरुणाईमध्येही दाढीबद्दल आकर्षण निर्माण झाल्याचे चित्र दिसते. नुसती दाढी वाढवून चालत नाही त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. जाणून घेऊयात Tips For Beard Growth... 

सेल्फी घेण्यासाठी बायका काय काय करतात? गुगलने केला अभ्यास​

Men's Grooming Tips:  
1. कांद्याचा रस

कांद्याचा रस दाढी वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतो. कांद्याच्या रस आणि 2-3 थेंब एरंडेल तेल दाढीला लावावे. 1-2 तासा ठेवल्यानंतर झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा.  

2. पौष्टिक आहारही गरजेचा
भरदार दाढीच्या लूकसाठी तुमच्या आहारात पौष्टिक पदार्थ असणे देखील गरजेचे आहे. पालक, सोयाबीन, कडधान्य यांसारख्या भाज्या खाव्या.  

3. नारळाचे तेल
नारळाच्या तेलाचे अनेक फायदे आहेत. दाढी वाढवण्याच्या उपायामध्येही ते उपयुक्त असेच आहे. नारळाचे तेल आणि रोजमेरी तेल यांचे 10: 1 प्रमाणे मिक्सिंग करुन चेहऱ्यावर मालीश करा. 15 मिनिटानंतर तोंड थंड पाण्याने धुवा. आठवड्यातून चारवेळा हे केल्याने तुम्हाला परिणाम दिसू लागेल.

ड्रेसिंग ट्रेंड : मलायकासारखे सुंदर दिसण्यासाठी ट्राय करा हटके लूक

4. दालचिनी आणि लिंबू 
दालचिनी आणि लिंबू की मदतीने तुम्ही दाढीची वाढ योग्यरित्य होण्यास मदत होते. दालचिनी पावडर आणि लिंबूचा रस एकत्रित करुन त्याचे पेस्ट तयार करा.  पेस्ट चेहऱ्याला लावून 20 मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा. दाढी वाढविण्यासाठी हे घरगुती उपाय परिणाम कारक ठरतील.  

(टीप : सदर बातमी माहितीच्या आधारावर आहे. कोणताही उपाय करताना आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

- लाईफस्टाइलसंबंधी इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)