Valentine Special : '... पण तू माझ्या लहान भावासारखा आहेस!'

आशिष नारायण कदम
Friday, 12 February 2021

फक्त भारतीयच नाही, तर अख्खं जग ज्यांच्या प्रेमात आहे, त्या ऑस्कर पुरस्कार विजेते ए.आर.रेहमान यांनी या चित्रपटाला म्युझिक दिलं आहे.

Valentine Special : पुणे : साउथ इंडियन फिल्म इंडस्ट्रीतलं सर्वात लोकप्रिय जोडपं म्हणजे समंथा आणि नागा चैतन्या. या दोघांचे चाहते त्यांचा चेसॅम नावाने उल्लेख करतात. या जोडीने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. पण ज्यावेळी या दोघांचही फिल्म इंडस्ट्रीत बस्तान बसलं नव्हतं, स्ट्रगल सुरू होता अशा वेळी त्यांना एका हिट चित्रपटाची गरज होती. प्रसिद्ध दिग्दर्शक गौतम मेनन यांनी या दोघांना सोबत घेत एक रोमँटिक तेलुगू चित्रपट बनवला आणि एका रात्रीत ही जोडी प्रेक्षकांची आवडती बनली. 

Valentine Special: 'गीता गोविंदम'च्या 'इनकेम इनकेम' गाण्यानं प्रेमात पाडलं​

२०१० मध्ये आलेल्या ये माया चेसावे (Ye Maaya Chesave) या तेलुगू चित्रपटाने प्रेमाची परिभाषा बदलून टाकली. कार्तिक (नागा चैतन्या) हा एक मेकॅनिकल इंजिनिअर असून त्याला फिल्ममेकर व्हायचं असतं, तर जेस्सी (समंथा) ही एका मल्याळी ख्रिस्तीयन अशा मध्यमवर्गीय फॅमिलीतील एक नोकरी करणारी मुलगी असते. कार्तिक हा जेस्सीपेक्षा २ वर्षांनी लहान असून तो जेव्हा जेस्सीला पहिल्यांदा पाहतो, तेव्हा तिच्या प्रेमात पडतो.

जेस्सीचे वडील कडक स्वभावाचे असल्याने कार्तिकला आपल्या प्रेमाची कबूली द्यायला थोडी भीती वाटत असते. पण एका दिवशी तो जेस्सीला प्रपोज करतो. दोन वर्ष लहान असणाऱ्या कार्तिकला जेस्सी 'तू मला माझ्या लहान भावासारखा आहेस,' असं सांगून निघून जाते, पण कार्तिक हार मानायला तयार नसतो. त्यानंतर ते पुढे कसे एकत्र येतात, हे चित्रपटात पाहण्यासारखं आहे. कार्तिक अमेरिकेत त्याच्या पहिल्या चित्रपटाचं शूटिंग करत असताना त्याला जेस्सी भेटते, तो क्लायमॅक्स सीन पाहण्यासारखा आहे. 

Valentine Special: 'फिल माय लव्ह', आर्याची जादू आजही कायम!

मिन्नाले (तेलुगू) या सुपरहिट रोमँटिक चित्रपटाने गौतम मेनन यांना दिग्दर्शक म्हणून ओळख मिळाली. 'रहना है तेरे दिल मे' या नावानं मिन्नालेचा हिंदी रिमेक त्यांनीच बनवला. ये माय चेसावे या चित्रपटाची कथाही स्वत: गौतम मेनन यांचीच आहे. ये माय चेसावेचे तमिळ आणि हिंदी (एक दिवाना था) मध्ये रिमेक बनवण्यात आले आहेत. 

फक्त भारतीयच नाही, तर अख्खं जग ज्यांच्या प्रेमात आहे, त्या ऑस्कर पुरस्कार विजेते ए.आर.रेहमान यांनी या चित्रपटाला म्युझिक दिलं आहे. चित्रपटातील सर्वच गाणी हिट झाली. पण होसाना या गाण्याला तुफान लोकप्रियता मिळाली. 

'मुलांनो, व्हँलेटाईन डे साजरा करण्यात वेळ घालवू नका'

ये माय चेसावेसाठी अभिनेत्री समंथा (बेस्ट फिमेल डेब्यु), दिग्दर्शक गौतम मेनन (बेस्ट डिरेक्टर), संगीतकार रेहमान (बेस्ट म्युझिक डिरेक्टर) आणि मनोज परमहंस (बेस्ट सिनेमॅटोग्राफर) यांना फिल्मफेअर आणि इतर अवॉर्डही मिळाले.

(व्हिडिओ सौजन्य : YouTube)

मंजुळा घट्टमानेनी आणि संजय स्वरुप यांनी या चित्रपटाची निर्मिती केली. ९.८० कोटी बजेट असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २०१० साली ४० कोटींचा बिझनेस केला होता. आणि त्यावेळचा हा सुपरहिट चित्रपट ठरला होता.

- व्हॅलेंटाइन स्पेशल आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Valentine day Special Samantha Akkineni and Naga Chaitanya Telugu Romantic movie ye maaya chesave