People Pleaser Habit
People Pleaser Habit esakal

People Pleaser Habit म्हणजे काय? तुमच्या मेंटल हेल्थसाठी ठरू शकते घातक; जाणून घ्या सविस्तर

काही लोक इतरांना आनंदी ठेवण्यामागे आपल्या आनंदाकडे दुर्लक्ष करत राहतात

People Pleaser Habit : काही लोक इतरांना आनंदी ठेवण्यामागे आपल्या आनंदाकडे दुर्लक्ष करत राहतात, ही सवय निःसंशयपणे तुम्हाला इतरांच्या नजरेत फेवरेट बनवू शकते, परंतु काही काळानंतर तुम्हाला मानसिक दडपण येते, याच सवयीला इंग्रजीत 'People Pleaser Habit' जाणून घेऊया याबाबत सविस्तर.

इतरांना आवडावं किंवा ते खुश व्हावेत म्हणून आपण त्यांना खुश करण्यासाठी बरेच प्रयत्न करत असतो. सुरूवातीला तुमच्या या सवयीचा तुम्हाला त्रास होत नाही मात्र हळूहळू तुमच्या याच सवयीमुळे तुम्हाला दडपण येऊ लागतं. मात्र तुम्ही कधी विचार केलाय का, की तुमच्या अशा वागण्यामागे नेमकं काय कारण असू शकतं ते?

आपल्यात पीपल प्लिझिंगची सवय कशी निर्माण होते?

जेव्हा एखाद्याला असे वाटते की लोक त्याला पसंत करणार नाहीत, त्याला सोबत ग्रुपमध्ये घेणार नाहीत, तेव्हा त्यांच्या हळूहळू ही सवय निर्माण होऊ लागते. सुरूवातील ही सवय तुम्हाला आनंदही देईल, परंतु जसे जसे मॅच्युअर व्हाल तसतसा तुम्हाला या सवयीमुळे मानसिक त्रास वाढेल.

पीपल प्लिझिंग सवयीचे तोटे

स्वतःकडे दुर्लक्ष होते

  • सतत इतरांच्या गरजा स्वतःच्या आधी ठेवून आपण स्वतःबद्दल विचार करणे सोडून देतो.

  • त्यांना आनंदी ठेवण्यासाठी इतरांच्या कामात आपला वेळ आणि शक्ती खर्च करतो.

  • अनेक वेळा लोक वैयक्तिक गोष्टींकडेही दुर्लक्ष करतात, जे भविष्यात तणावाचे कारण बनू शकतात.

People Pleaser Habit
Mental Health : कोणी कोणाचं नसतं हेच खरं; डिप्रेशनमधून बाहेर पडायला स्वत:ला अशी करा मदत!  

नाराजी आणि निरूत्साह

आपल्या गरजा आणि इच्छा दडपून आपल्याला इतरांबद्दल आणि स्वतःबद्दल चीड निर्माण होऊ लागते. कालांतराने, यामुळे निराशा, राग आणि जीवनाबद्दल असंतोष अशा भावना तुम्हाला जाणवतील.

आत्मविश्वासाची कमतरता

अशा लोकांमध्ये समाधान नसते आणि आत्मविश्वासाचीही कमतरता जाणवते. इतरांनी आपल्यावर आनंदी राहावे, आपले ऐकावे, आपल्याला आपल्यासोबत ठेवावे यासाठी काय करता येईल या गोष्टींचा सतत अशा सवयींचा लोकांच्या मनात विचार चालला असतो.

पीपल प्लिझींगच्या सवयीतून तुमची सुटका कशी करून घ्यायची?

आत्म-जागरूकत

लोकांना आनंदी ठेवण्याच्या नादात तुमच्या मानसिक आरोग्यावर त्याचा काय परिणाम होतोय ते जाणून घ्या. तुमच्या आतील भितीवर मात करत तुम्हाला कशातून प्रेरणा मिळेल याचा विचार करा.

People Pleaser Habit
Mental Health : 'साठी बुद्धी नाठी' नाही तर, चाळीशीतच बदलतंय मेंदूचं वायरींग, शास्त्रज्ञ सांगतात...

नाही म्हणायला शिका

या सवयीपासून मुक्त होण्याचा सर्वात महत्त्वाचा मार्ग म्हणजे नाही म्हणण्याची सवय लावणे. नाही म्हटल्याने तुमच्या अर्ध्याहून अधिक समस्या सुटतील. अर्थात, तुम्हाला हव्या असलेल्या लोकांची संख्या कमी होईल, परंतु तुम्हाला मानसिकदृष्ट्या आराम मिळेल. (Lifestyle)

People Pleaser Habit
lifestyle choices : जगण्याच्या पद्धती बदला अन् स्मृतिभ्रंशाचा धोका टाळा, हॅप्पी लाइफ जगा

स्वत:ची काळजी घ्या

स्वत: ची काळजी घेण्याच्या क्रियाकलापांना प्राधान्य द्या जे तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या आनंदी ठेवतील, जसे की छंद जोपासण्यासाठी वेळ काढणे, फिरायला जाणे, तुम्हाला हवं ते करणे. (Mental Health)

मदत मिळवा

सगळे प्रयत्न करूनही तुमची पीपल प्लिझींगची सवय जात नसेल तर डॉक्टरांचा सल्ला एकदा नक्की घ्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com