जीन्स पॅन्टला छोटा खिसा का असतो ? ‘या’ लोकांसाठी बनवण्यात आलाय

जीन्सला छोटा खिसा का असतो याचा कधी विचार केलाय का तुम्ही ?
Why Do Jeans have Short Pocket
Why Do Jeans have Short Pocketesakal

काळानुसार फॅशन बदलली तरी जीन्स पॅन्टची लोकप्रियता कमी झाली नाही. सध्या जीन्स फॅशन नाही तर गरज बनली आहे. स्त्री आणि पुरुषांमध्ये जीन्स खूप लोकप्रिय आहे. इतर पॅन्टच्या बदल्यात जीन्स घालणं जास्त सोयीस्कर असल्यामुळेच तिची लोकप्रियता टिकून आहे. जीन्स पॅन्टला छोटा खिसा का असतो हे तुम्हाला माहिती आहे का? असेच फॅशन किंवा डिझाईन म्हणून हा खिसा बनवला गेला नाही. तर एका महत्त्वाच्या कामासाठी छोटा खिसा बनवला गेला आहे. चला त्याबद्दलच जाणून घेऊयात.

Why Do Jeans have Short Pocket
'माझं मन इतकं चंचल की...', प्राजक्ताचं गणेशाला साकडं

जीन्स पॅन्टच्या छोट्या खिशाला ‘वॉच पॉकेट’ सुद्धा म्हटलं जातं. खाणीत काम करणाऱ्या मजूरांसाठी जीन्स पॅन्टचा अविष्कार झाला होता. त्याकाळात खिशात ठेवता येणारी पॉकेट घड्याळे असायची. त्यामुळे मजूरांना ही घड्याळे खिशात सुरक्षित ठेवता यावीत यासाठी हा खिसा बनवण्यात आला. मजुरांनी घड्याळे पुढच्या खिशात ठेवली तर ती तुटण्याची भिती असायची या समस्येवर उपाय शोधण्यासाठीच जीन्समधील या छोट्या खिशाचा जन्म झाला. गरजेपोटी सुरू झालेला हा छोटा खिसा नंतर जीन्सचा एक अविभाज्य घटक बनला आहे.

Why Do Jeans have Short Pocket
मनावर नियंत्रण मिळवणारी बाप्पाची ७ शस्त्रे

जीन्स पॅन्टची खासियत अशी की ती कधीही, कुठेही वापरता येते. जीन्स पॅन्टबरोबर तुम्ही कोणतेही कॉम्बिनेशन करू शकता. सुरूवातीच्या काळात जीन्समध्ये चार पॉकेट असायचे. यामध्ये एक पॉकेट मागील बाजूस असायचे आणि दोन पॉकेटमध्ये ही छोटी वॉच पॉकेट असायची. सध्या या खिशाला अनेक नावे देण्यात आली आहेत. फ्रंटियर पॉकेट, कंडोम पॉकेट, कॉइन पॉकेट, मॅच पॉकेट आणि तिकट पॉकेटही म्हटलं जातं.

Why Do Jeans have Short Pocket
धडे बाप्पाचे, २१ मार्ग यशाचे : काय आहे गणेशाच्या उपासनेचा पासवर्ड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com