Indian Culture : संस्कारशील पिढीतूनच निकोप समाजनिर्मिती, पाश्चात्य संस्कृतीचं आकर्षण का?

संस्काराची जननी आणि संस्कृतीची रक्षक म्हणून जगात भारताकडे सन्मानाने पाहिले जाते
Indian Culture
Indian Cultureesakal

Indian Culture

संस्कृती असे जणू,

संस्काराची खाण

जपू वारसा संस्कृतीचा

हेच संस्काराचे दान

भारतीय संस्कृती जगातील सर्व संस्कृतीची जननी समजली जाते. ज्या देशाची संस्कृती सर्वश्रेष्ठ आहे. अशा देशाचे आपण नागरिक आहोत. याचा अभिमान असावा. संस्काराची जननी आणि संस्कृतीची रक्षक म्हणून जगात भारताकडे सन्मानाने पाहिले जाते.

मुलांवर पहिले संस्कार आईच करते. संस्काराची जननी म्हणून कुटुंबात आईचे स्थान अढळ आहे. आईचे अनुकरण मुलं करतात. बाळाचे संपूर्ण विश्‍व महणजे आई. म्हणूनच म्हणतात ना, ‘ठेच लागता त्याच्या पायी, वेदना होतात आईच्या हृदयी.’ याचा अर्थ वडिलांची जबाबदारी नाही, असा होत नाही. प्रश्‍न अनुकरणाचा व त्यातून मिळणाऱ्या अनुभवांचा आहे.

आईने केलेल्या संस्काराचे रक्षण वडील करतात. संस्कार संस्कृतीतून घडतात. मूल जन्माला येण्यापूर्वीपासूनच भारतीय संस्कृतीने सोळा संस्कार सांगितले आहेत. गर्भ संस्कारापासून सुरू झालेल्या संस्काराचा शेवट मृत्यू संस्कारपर्यंत होतो. मनुष्याच्या आचरणातून बालमनावर संस्कार घडतात. पती-पत्नी, सासू-सून, गुरू-शिष्य, आई-मुले, मित्र-मैत्रिणी,  पिता-पुत्रांचे नाते समाज संस्कृतीचाच भाग आहे. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव ही आपली संस्कृती आहे. पण, अलीकडे भारतीय संस्कृतीला छेद देण्याचे काम तरुणांकडून होताना दिसते.

पाश्‍चात्त्य संस्कृतीचे आकर्षण वाढले आहे. याउलट विदेशी तरुण भारतात भारतीय संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी येतात. येथे येऊन अध्यात्म शिकतात. विठ्ठल नामाचा गजर करायला शिकतात. त्यांना संयुक्त कुटुंब पद्धतीने मोठे आकर्षण आहे. मात्र, या सुसंस्कृत भारतात पाश्‍चात्त्य संस्कृतीचे आकर्षण वाढत आहे. मायमराठी विसरत चालले आहेत. इंग्रजी भाषा बोलणे सुशिक्षितपणाचे लक्षण असले तरी ते सुसंस्कारितपणाचे नक्कीच नाही.

विचार, ज्ञान, संस्कार, संस्कृतीने प्रगल्भ करण्यापेक्षा पैशाने जो श्रीमंत असतो तो सन्मानाने मोठा, ही भावना समाजाकडून रुजवली जाते, ही अतिशय चिंतेची बाब आहे. पैसा उपजीविकेचे साधन आहे. परंतु त्याला संस्काराची जोड हवीच. अन्यथा प्रत्येकासाठी वृद्धाश्रम तयार करावे लागतील. (India) फॅशनच्या नावाखाली तोकडे, ठिगळं लावलेले कपडे, धूम्रपान, मद्यपान, लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणे हा विचार अलीकडे रूढ होत आहे. यावरही चिंतनाची गरज आहे. अन्यथा पाश्‍चात्त्य संस्कृतीप्रमाणे प्रत्येक घराजवळ आपली एक लेक अत्याचाराची बळी पडलेली दिसल्याशिवाय राहणार नाही.

Indian Culture
Top Mosques of India: भारतातील ह्या मशिदी आहेत जगभरात प्रसिद्ध; एकदा तरी भेट द्याच

उच्च शिक्षणासाठी परदेशात मुलगा शिकायला किंवा नोकरीनिमित्त जाणे यात पालक धन्यता मानतात. पण, ज्या मातीत मी वाढलो, ज्या मातीने मला घडवले तिची महती, तिचे श्रेष्ठत्व जाणून तिचे ऋण फेडायला विसरतात. पूर्वी जन्मदिवस देवासमोर दिवा लावून, दान करून साजरा व्हायचा. परंतु हल्ली पाश्‍चात्त्य संस्कृतीप्रमाणे वाढदिवस मेणबत्ती विझवून साजरे केले जातात. एकाच वास्तूतील एक संस्कार दुर्योधन घडवितो आणि एक संस्कार पांडव. एक संस्कार प्रेम शिकवितो तर एक द्वेष. एक संस्कार माणूस घडवितो तर एक दानव. एक देशाला विजयाचे तोरण बांधतो, तर एक संस्कार देशाला अधोगतीला नेतो. (Sanskruti)

या संस्कारातूनच डॉ. आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज, सावित्रीबाई, शिवाजी, स्वामी विवेकानंद यांसारखे अनेक थोर पुरुष घडले.  नुकतीच घडलेली घटना आहे. हरियाणातील चरखी दादर येथे एक एप्रिलला  प्रशासकीय सेवेतील अधिकारी (आयएएस) असणाऱ्या कुटुंबातील आजी आजोबांनी पोट भरण्यासाठी दोन भाकरीही मिळत नसल्याने आत्महत्या केली. त्यामुळे आता या संस्काराला, संस्कृती वाचविणे गरजेचे आहे.

Indian Culture
Hindu Culture : लग्नात नवरीला उलटं मंगळसूत्र का घालतात? जाणून घ्या मंगळसूत्राचं महत्व

संस्काराने मजबूत होतो

नीतिमत्तेचा खांब

सद्‍गुणांची फुले फुलूनी

दुर्गुण पळती लांब

म्हणूनच संस्काराची जननी आणि संस्कृतीचे रक्षक बना.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com