Women Health : स्तनपान केल्याने स्तन गळून पडतात का?, स्तनांबाबत प्रत्येक पुरूषाला आहेत हे गैरसमज?

व्यायामामुळे स्तनांचा आकार वाढवता येतो?
Women Health
Women Healthesakal

Women Health :  

मुली किंवा महिलांच्या व्यक्तिमत्त्वात, सौदर्यात त्यांच्या स्तनाचा आकार महत्त्वाची भूमिका बजावतो. स्तनांचा योग्य आकार महिलांचे व्यक्तिमत्व वाढवतो. याशिवाय महिलांमध्ये आत्मविश्वासही वाढतो. ज्या स्त्रियांचे स्तन सामान्यपेक्षा लहान आहेत अशा स्त्रियांना स्वत:मध्ये काहीतरी कमतरता आहे, असे नेहमी वाटत राहते.

स्तनांच्या आकाराबाबत महिलांमध्ये अनेक समज प्रसिद्ध आहेत, ज्यांना लोक सहसा खरे मानतात. चला तर जाणून घेऊया स्तनांच्या आकाराशी संबंधित काही समज.

Women Health
महिलांसाठी तीन दिवस मोफत स्तन स्क्रिनिंग, कर्करोगमुक्त झालेल्यांचा सन्मान

स्तनाचा आकार नेहमी एक सारखाच राहतो

अनेकदा लोकांना वाटते की स्तनाचा आकार आयुष्यभर सारखाच राहतो. हा एक मोठा गैरसमज आहे. वजन वाढल्याने, तुमच्या स्तनांचा आकारही बदलू शकतो. वयोमानानुसार स्तनांचा आकारही बदलतो. त्यामुळे तुम्ही या गैरसमजांवर कधीही विश्वास ठेवू नये.

स्तनपान केल्याने स्तनांची त्वचा सैल पडते

स्तनपान केल्यामुळे महिलांचे स्तन सळसळू लागतात किंवा सैल होतात, असे अनेकदा म्हटले जाते. तर असे अजिबात नाही. स्तनपान केल्याने स्तनांची त्वचा सैल नाहीत. सत्य हे आहे की वयानुसार स्तन मोकळे होतात. अशा परिस्थितीत काळजी करण्याची गरज नाही. जर तुम्ही स्तनपान करत असाल तर कोणतीही भीती न बाळगता स्तनपान करा.

Women Health
Breast Cancer : स्तन कर्करोगाविषयी मुंबई शहरांतही अनभिज्ञता

व्यायामामुळे स्तनांचा आकार वाढवता येतो

जेव्हा मुलीचे स्तन आकाराने लहान असतात किंवा तिचे स्तन आकर्षक दिसत नाहीत तेव्हा तिला अनेकदा व्यायाम आणि योगासने करण्याचा सल्ला दिला जातो. तथापि, आम्ही तुम्हाला सांगतो की स्तन हे स्नायू नसून ऊतींनी बनलेले असतात. व्यायामामुळे स्नायूंचे प्रमाण वाढते. पण यामुळे स्तनांच्या आकारात फारसा बदल होत नाही.

स्तनाचा आकार दुधाचे उत्पादन ठरवतो

बहुतेकदा लोकांना असे वाटते की जेव्हा स्तनांचा आकार छोटा आहे म्हणजे पुरेसे दूध तयार होत नसते. पण असे नाही. दुधाचे प्रमाण स्तनांच्या आकारावर अवलंबून नसते. ते आई किती पोषक तत्वांनी भरपूर अन्न खात आहे त्यार ठरते. स्तनाचा आकार आणि दूध उत्पादन यांचा काही संबंध नाही. अनेक वेळा स्तनांचा आकार वाढतो, पण पुरेशा प्रमाणात दूध तयार होत नाही.  

Women Health
Hindu Woman Murderd in Pak: पाकिस्तानात हिंदू महिलेची हत्या! हातपाय तोडून शीर अन् स्तन...; काळजाचा उडेल थरकाप

पौगंडावस्थेनंतर स्तनांची वाढ थांबते

स्त्रीला तिच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर बदलांना सामोरे जावे लागते. पौगंडावस्थेनंतर स्तनांचा आकार वाढणे थांबते, असे अनेकदा लोकांना वाटते. परंतु काही महिलांमध्ये हार्मोनल बदलांमुळे किंवा इतर कारणांमुळे स्तनांच्या आकारावर परिणाम होऊ शकतो. काही लोकांचे स्तन पौगंडावस्थेनंतर बदलू शकतात, तर काहींचे नाही.

तसेच वय उतरंडीला लागले की स्तनांची त्वचा मऊ पडायला लागते. विशेषत: महिलांमध्ये मोनोपॉझ सुरू झाला की स्तनांमध्ये वेदना, अन् आकारात बदल या समस्यांना सामोरे जावे लागते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com