World trauma day 2022 : अपघातावेळी काय करावे, काय करू नये

जगभरात अपघातामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या प्रचंड
World trauma day 2022 : अपघातावेळी काय करावे, काय करू नये
Updated on

पुणे : दरवर्षी जगभरातील लाखो अपघातामूळे मृत्यूमुखी पडतात. अनेकांना कायमचे त्यांना अपंगत्व येते. या अपघाताच्या घटना पाहून त्या अनुभवून केवळ त्याच व्यक्ती नाही. तर त्यांचे कुटुंबच नाही तर अशा बातम्या ऐकून इतर लोकांनाही त्याचा धक्का बसतो. अपघातातील लोकांना मदत कशी करावी ज्यामुळे त्यांचे प्राण वाचतील यासाठी पार्श्वभूमीवर जगभरात आज (१७ ऑक्टोबर) जागतिक ट्रामा डे साजरा केला जातो.

World trauma day 2022 : अपघातावेळी काय करावे, काय करू नये
World Students' Day 2022: विद्यार्थ्यांसह पालकांनीही एकदा पहाच ‘हे’ चित्रपट

जगभरात अपघातामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या प्रचंड आहे. शासकीय आकडेवारीनुसार आपल्या देशात दरवर्षी चार लाख मृत्यू अपघातामुळे होतात. दर पाच मिनिटाला एका व्यक्तीचा मृत्यू होत असल्याचे शासकीय अहवालात नमूद करण्यात आले आहे.

World trauma day 2022 : अपघातावेळी काय करावे, काय करू नये
World Sight Day 2022 : कधी झाली जागतिक दृष्टिहीन दिन साजरा करण्याची सुरूवात?

काय आहे ट्रामा डे

मेडीकल भाषेत सांगायचे तर ट्रॉमाला अपघात किंवा कोणत्यातरी वाईट घटनेने शारीरावर झालेला आघात मानला जातो. आघात हा रस्ता अपघात, घरगुती हिंसाचार, नैसर्गिक आपत्ती आणि इतर अनेक घटनांनी घडलेला अपघात असू शकतो. या आघाताचा शारीरावर आणि मनावर परिणाम होऊ शकतो. परंतु काहीवेळा या अपघातांमुळे येणारे शारीरिक अपंगत्व एखाद्या व्यक्तीच्या मनावर परिणाम करू शकते.रोड ट्रॅफिक अपघात ज्यांना 'आरटीए' देखील म्हणतात. हे आघाताचे मुख्य कारण आहेत. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB)च्या अहवालानुसार, भारतात 2013 मध्ये सुमारे 1 लाख 37 हजार लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. तेव्हापासून ही संख्या सातत्याने वाढत आहे.

World trauma day 2022 : अपघातावेळी काय करावे, काय करू नये
World's Arthritis Day 2022 : संधिवातामुळे खराब झालेल्या गुडघ्यांची ट्रान्सप्लांट सर्जरी रोबोटिक्समुळे सोप्पी

ट्रामाशी निगडीत काही तथ्य

जगभरात सुमारे दरवर्षी 5 लाख, तर भारतात 10 लाख लोक रस्ते अपघातांमुळे मरण पावतात. तर काहींना शारीरिक अपंगत्वाचा सामना करावा लागतो.जगात होणाऱ्या अपघातापैकी 1/5 अपघात भारतात होतात.आपल्या देशात, दर 2 मिनिटांनी एक रस्ता अपघात होतो. दर 8 मिनिटाला एका व्यक्तीचा अपघाती मृत्यू होतो.भारतात रस्ते अपघातांना बळी पडणाऱ्यांमध्ये जास्त तरुणांची संख्या आहे.दरवर्षी आपल्या देशात रस्ते अपघातांचे प्रमाण ३ टक्क्यांनी वाढते.

World trauma day 2022 : अपघातावेळी काय करावे, काय करू नये
World Tourism Day 2022 : बीच शॅक्स परवानगीच्या प्रतीक्षेत

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या मते, विकसित देशांमध्ये 50 टक्के रस्ते अपघात होतात. रस्ते अपघातामुळे होणारे मृत्यू आणि शारीरिक अपंगत्वाचे प्रमाण कमी होऊ शकते.पण, केवळ रस्ता सुरक्षेसाठी नियम करून हे शक्य होणार नाही. सर्वसामान्यांना रस्ता सुरक्षेचे नियम माहित असणे आणि त्यांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. याशिवाय, लोकांना घरांमधील अपघातांबाबत प्रथमोपचारांची माहिती असणे देखील खूप महत्वाचे आहे. अपघातापासून बचावासाठी काय करावे हे जाणून घेऊयात.

World trauma day 2022 : अपघातावेळी काय करावे, काय करू नये
World Tribal Day 2022 : येवलेकरांनी अनुभवली आदिवासी संस्कृती

बचावासाठी काय करावे

रस्ता सुरक्षेचे नियम पाळा. वाहन चालवताना सुरक्षा चिन्हे आणि नियमांचे संकेतांचे पालन करा. दुचाकी चालवताना नेहमी हेल्मेट वापरा. ड्रायव्हींग करताना मोबाईल वापरू नका. जर तुम्ही लाँग रूटचा प्रवास करणार असाल तर छोट्या अंतरावर ब्रेक घ्या. घरी अपघाताची घटना झाल्यास काय करावे. घरातील लहान मुलांना नेहमी विजेचे स्विच आणि टोकदार वस्तूंपासून दूर ठेवा. घरामध्ये आणि वाहनात नेहमी प्रथमोपचार किट तयार ठेवा. पायऱ्या, बाल्कनी, छत आणि खिडक्या यासाठी आवश्यक सुरक्षा कठडे वापरा. CPR सारख्या आपत्कालीन परिस्थितीत जीव वाचवण्याच्या टेक्निकबद्दल जागरूक रहा.

World trauma day 2022 : अपघातावेळी काय करावे, काय करू नये
World Coconut Day 2022: देवासमोर नारळ का फोडतात?

काय करू नये

थकलेल्या, झोपलेल्या अवस्थेत किंवा मादक पदार्थाचे सेवन केले असेल अशा स्थितीत ड्रायव्हींग करू नका. ड्रायव्हींग फास्ट करून धोका पत्करू नका. अपघातात बेशुद्ध असेलेल्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचे द्रव देऊ नका. एखाद्या व्यक्तीच्या डोक्याला किंवा पाठीच्या कण्याला दुखापत झाली असेल. तर डॉक्टर किंवा कोणत्याही आरोग्य कर्मचाऱ्याच्या अनुपस्थितीत त्याला हलवू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com