Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Loksabha Election 2024 : उद्या अर्ज भरण्याची शेवटची तारीख असताना आज भाजपनं ही उमेदवारी जाहीर केली आहे.
Hemant Savara
Hemant Savara

Lok sabha Election 2024 Marathi News : महायुतीचा पालघरच्या जागेचा तिढा अखेर सुटला असून ही जागा भाजपच्या वाट्याला गेली आहे. या ठिकाणी भाजपनं राज्याचे माजी मंत्री दिवंगत विष्णू सावरा यांचे पुत्र डॉ. हेमंत सावरा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. उद्या इथं उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे.

शिवसेनेची जागा भाजपनं घेतली

मुंबईतल्या सर्व जागा जाहीर झाल्यानंतर काल ठाणे आणि कल्याणची जागाही महायुतीनं जाहीर केली. या दोन्ही जागा शिंदेंची शिवसेना आपल्याकडं राखण्यात यशस्वी ठरली. पण पालघरच्या जागेचा तिढा कायमच होता. कारण या जागेवरही भाजपनंही दावा केला होता. त्यामुळं ही जागा शिवसेनेला की भाजपला सुटणार याची उत्सुकता होती. (Latest Maharashtra News)

पण अखेर ही जागा भाजपला मिळाली असून भाजपनं राज्याचे माजी मंत्री दिवंगत विष्णू सावरा यांचे पुत्र डॉ. हेमंत सावरा यांना उमेदवारी जाहीर केली. पालघर हा लोकसभा मतदारसंघ अनुसुचित जमातीसाठी अर्थात एसटी प्रवर्गासाठी राखीव आहे. (Latest Marathi News)

Hemant Savara
ठाण्यातील महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्केंना ओळखलंत का?

दरम्यान, पालघरमध्ये आता भाजपविरुद्ध ठाकरेंची शिवसेना असा सामना पहायला मिळणार आहे. कारण यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी भारती कामडी यांना पालघरमधून महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर केली आहे. त्याचबरोबर याच मतदारसंघातून हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीकडून राजेंद्र पाटील यांना निवडणूक रिंगणात उतरवलं आहे. तर वंचित बहुजन आघाडीकडून विजया म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय सात अपक्ष उमेदवार इथून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. (Marathi Tajya Batmya)

Hemant Savara
Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

कोण आहेत हेमंत सावरा?

हेमंत सावरा हे राज्याचे दिवंगत माजी आमदार आणि आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांचे पुत्र आहेत. ते भाजपकडून विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख आहेत. तसेच भाजपच्या अनुसुचित जमाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस आहेत. तसेच हिंदू सेवा संघाचे ते अध्यक्षही आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com