Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

नुकतेच नवी मुंबईत एका प्रवाशाला अशाच काही तरुणांनी ट्रेनमधून ढकलून दिल्याचा प्रकार घडला होता.
mumbai local
mumbai localsakal

मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनमध्ये नशेडी तरुणांनी हैदोस घातला आहे. अशाच एका गर्दुल्यांच्या टोळक्यानं एका प्रवाशाचा धारदार शस्त्रानं खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यानंतर प्रवाशांनी या हल्लेखोर तरुणांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. दरम्यान, नुकतीच नवी मुंबईतील रेल्वे लाईनवर एका प्रवाशाला रेल्वेतून ढकलून देण्यात आल्याची घटना घडली होती. (Commuter killed by mobsters in Mumbai Local train a shocking incident happened)

mumbai local
Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

दत्तात्रय भोईर असं हत्या झालेल्या प्रवाशाचं नाव आहे. कल्याण लोहमार्ग पोलिसांमध्ये आरोपी तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या खडवली आणि वाशिंद या दोन स्थानकांदरम्यान लोकलमध्ये हा प्रकार घडला आहे. २७ आणि २८ एप्रिलच्या मध्यरात्री तीन-चार नशेखोर तरुणांनी हा प्रकार केला. (Latest Marathi News)

या तरुणांनी लोकलमधील लोकांचे मोबाईल आणि सोन्याच्या साखळ्या खेचण्याचाही प्रयत्न केला. ज्या प्रवाशांनी याला विरोध केला त्यांना या तरुणांनी पट्ट्यानं मारहाण केली. यातच शहापूरचे रहिवासी असलेल्या दत्तात्रय भोईल यांनी विरोध केला तर या तरुणांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रानं वार केले. भाईर हे २७ तारखेला उल्हासनगरमधील नातेवाईकांचा एक हळदीचा कार्यक्रम आटोपून घरी निघाले होते. (Marathi Tajya Batmya)

mumbai local
Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

दरम्यान, नवी मुंबईत बुधवारी उत्तर प्रदेशातील एका तरुणाला धावत्या लोकलमधून बाहेर ढकलून देण्यात आल्याचा प्रकार घडला होता. लोकलमध्ये काही तरुणांसोबत भांडण झाल्यानंतर त्या तरुणांनी त्याला थेट बाहेर ढकलून दिलं होतं. यावेळी ट्रेनचं चाक या तरुणाच्या हातावरुन गेल्यानं त्याचा हात कायमचा निकामी झाला आहे. मुंबई पोटापाण्यासाठी आलेल्या या तरुणाला कायमचं जायबंदी व्हावं लागलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com