'..तर भविष्यात भाजप सरकार संविधान शिल्लक ठेवणार नाही'; 'मविआ'चे उमेदवार सत्यजित पाटलांचा हल्लाबोल

शेतकरी व कारखानदार यांच्यामध्ये भांडणे लावून सरकार बघ्याची भूमिका घेत आहे.
Mahavikas Aghadi candidate Satyajit Patil-Sarudkar
Mahavikas Aghadi candidate Satyajit Patil-Sarudkaresakal
Summary

'ज्या विश्वासाने माझी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, त्याला कोणताही तडा न देता, जनसेवेचे काम अखंडितपणे सुरू ठेवीन.'

शिरोळ : ‘सर्वसामान्य जनता सुरक्षित राहाण्यासाठी व संविधान (Constitution) टिकविण्यासाठी जागरूक राहण्याची आवश्यकता आहे. लोकसभेमध्ये तुमच्या सूज्ञ विचारांना चालना देणारा आणि काम करणारा हक्काचा प्रतिनिधी पाठविण्याकरिता मला संधी द्या,’ असे आवाहन हातकणंगले (Hatkanangale Lok Sabha) मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील- सरूडकर (Satyajit Patil- Sarudkar) यांनी केले.

महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) पदाधिकाऱ्यांचा व प्रमुख कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा येथील माजी आमदार उल्हास पाटील यांच्या निवासस्थानाच्या प्रांगणात झाला. सत्यजित पाटील म्हणाले, ‘ही निवडणूक गांभीर्याने घेतली पाहिजे. संविधानाची कशाप्रकारे थट्टा सुरू आहे, हे संपूर्ण देशाने पाहिले आहे.

Mahavikas Aghadi candidate Satyajit Patil-Sarudkar
कोल्हापुरात जन्मलेला प्रत्येक सामान्य कार्यकर्ता राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा वारसदारच आहे; काय म्हणाले मंडलिक?

शेतकरी व कारखानदार यांच्यामध्ये भांडणे लावून सरकार बघ्याची भूमिका घेत आहे. मध्यस्थीची भूमिका सरकारने बजावून, न्याय देण्याची भूमिका घेतली नाही. यामुळे भविष्यात हे सरकार संविधान शिल्लक ठेवणार नाही. ज्या विश्वासाने माझी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, त्याला कोणताही तडा न देता, जनसेवेचे काम अखंडितपणे सुरू ठेवीन. महाविकास आघाडीच्यावतीने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध उपयोगी योजना राबविण्यात येतील.’

Mahavikas Aghadi candidate Satyajit Patil-Sarudkar
'सांगली'त गोंधळ, 'हातकणंगले'त चिंता; शिवसेनेकडून काँग्रेसची अभूतपूर्व कोंडी, वाळवा-शिराळ्यातील मतदान ठरणार निर्णायक

याप्रसंगी माजी आमदार उल्हास पाटील, डॉ. सुजित मिणचेकर, माधवराव धनवडे, शेखर पाटील, सर्जेराव शिंदे, रावसाहेब भिलवडे आदींनी मनोगत व्यक्त केले. मेळाव्यास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वैभव उगळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विक्रमसिंह जगदाळे, बंटी देसाई, बाबासाहेब सावगावे, अनंत धनवडे, बी. जी. माने, मधुकर पाटील, मंगलाताई चव्हाण आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com