Jalgaon Lok Sabha Election 2024 : जिल्ह्यात आचारसंहितेची अंमलबजावणी सुरु : जिल्हाधिकारी प्रसाद

Jalgaon Lok Sabha Election 2024 : मुख्य निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू करताच, जिल्ह्यात मंत्र्यांची वाहने जमा करण्यात आली आहेत.
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024 esakal

Jalgaon Lok Sabha Election 2024 : मुख्य निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू करताच, जिल्ह्यात मंत्र्यांची वाहने जमा करण्यात आली आहेत. काटेकोर अंमलबजावणीसाठी विविध ठिकाणी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. नागरिकांनी लोकशाहीचा उत्सव आनंदाने साजरा करावा. असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.

पोलिस अधीक्षक डॉ. महेश्‍वर रेड्डी, रावेर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अंकुश पिनाटे, निवडणूक उपजिल्हा अधिकारी अरविंद अंतुर्लीकर हेही उपस्थित होते. (Jalgaon Lok Sabha Election Collector Prasad statement Implementation of code of conduct started in district)

उत्सव समजून मतदार करा

जिल्हाधिकारी प्रसाद म्हणाले, की लोकशाहीचा हा उत्सव समजून मतदारांनी सहभागी व्हावे. आचारसंहितेचा भंगाची तक्रार आल्यास, अर्धा तासात संबंधित अधिकारी कारवाई करतील. सी व्हिजिल ॲपवर नागरिक तक्रारी करू शकतात. सोशल मिडियावर बारीक लक्ष असणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष तयार करण्यात आला आहे.

उमेदवाराला ९५ लाखाची खर्च मर्यादा आहे. उमेदवार एकावेळी दोन मतदार संघातून अर्ज भरू शकतो. मान्यता प्राप्त पक्षाच्या उमेदवाराला एक सूचक लागेल. विना मान्यता प्राप्त/अपक्ष उमेदवाराला १० सूचक लागतील. (latest marathi news)

Lok Sabha Election 2024
Loksabha Election : महाराष्ट्रातील या चार लोकसभा मतदारसंघातील राजकीय सध्यस्थितीची जाणून घ्या माहिती

पोलिस यंत्रणा सतर्क

पोलिस अधिक्षक डॉ. रेड्डी यांनी जिल्ह्यात मतदान काळात येणारी बोगस दारूवर नियंत्रणासाठी योग्य त्या दक्षता घेतल्या आहेत. जे संशयित निवडणुकीत गडबड करू शकतात अशा आतापर्यंत १०१ जणाविरोधात प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या. ८ जणांवर एमपीडीए’ची कारवाई केली आहे. २५ शस्त्र जप्त केले आहेत. अतिरिक्त पोलिस बंदोबस्त मागविला आहे. सायबर सेल ॲक्टिव्ह करण्यात आला आहे.

आकडे बोलतात..

एकूण मतदार--३५ लाख ११ हजार

पुरूष मतदार--१८ लाख २० हजार ६४९

महिला मतदार--१६ लाख ९८ हजार ९२३

तृतीय पंथीय मतदार -१२६

रावेर मतदार संघात मतदान केंद्र-३८८६

जळगाव मतदार संघात मतदान केंद्र--१९८२

मतदानाची तारीख -१३ मे

Lok Sabha Election 2024
Jalgaon Lok Sabha Election 2024 : रावेरसाठी ॲड. पाटील, चौधरींची चर्चा; ॲड. रोहिणी खडसेंचा लोकसभा लढण्यास नकार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com