Moral Code Of Conduct: आचारसंहिता म्हणजे काय रे भाऊ? पाच मुद्द्यांत जाणून घ्या प्रकरण

Loksabha Election 2024: यंदा भाजप आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांमध्ये मोठी लढत होणार आहे. तर, प्रादेशिक पक्षांनीही निवडणुकीसाठी आपली कंबर कसली आहे.
What Is Moral Code Of conduct:
What Is Moral Code Of conduct:Esakal

Moral Code Of conduct:

केंद्रिय निवडणूक आयोग आज लोकसभा निवडणूक 2024 साठी तारखा जाहीर करणार आहे. तारखा जाहीर झाल्यानंतर देशभरात आचारसंहिता लागू होईल.

दरम्यान, देशभरातील राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी जोरदार तयारी चालू केली आहे. यामध्ये भाजप आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांमध्ये मोठी लढत होणार आहे. तर, प्रादेशिक पक्षांनीही निवडणुकीसाठी आपली कंबर कसली आहे.

आचारसंहिता म्हणजे काय?

मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोगाने काही नियम केले आहेत. या नियमांना आचारसंहिता म्हणतात.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी सर्व पक्ष, नेते आणि सरकारने या नियमांचे पालन करणे बंधनकारक असते.

आचारसंहिता केव्हा लागू होते?

एखाद्या निवडणुकीसाठी जेव्हा तारखा जाहीर होतात तेव्हापासूनच आचारसंहिता लागू होते. ही आचारसंहिता संपूर्ण निवडणूक प्रक्रिया संपून निवडणुकीचा निकाल लागत नाही तोपर्यंत लागू असते.

What Is Moral Code Of conduct:
Loksabha Election: महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; भाजप ३१, शिंदे गट ‍‌१२, राष्ट्रवादी ४ जागा लढणार?

आचारसंहितेचा प्रथम वापर केव्हा झाला?

सध्या देशात निवडणुकीच्या काळात आचारसंहिताला अनन्यसाधारण महत्त्व असले तरी, देशात आचारसंहितेचा वापर पहिल्यांदा 1960 मध्ये केरळ विधानसभेच्या निवडणुकीवेळी झाला होता.

लोकसभा निवडणुकीसाठी 1960 मध्ये याचा पहिल्यांदा वापर झाला होता.

आचारसंहिता न पाळल्यास काय होते?

आचारसंहितेची अंमलबजावणी निवडणूक आयोगाकडून करण्यात येते. निवडणुकीच्या कालावधीत एकाद्या पक्षाने, उमेदवाराने किंवा त्यांच्या कार्यकर्त्याने आचारसंहितेचा भंग केल्यास निडणूक आयोगाकडे त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार असतो.

What Is Moral Code Of conduct:
Satara Loksabha : साताऱ्यातून उदयनराजेंचा पत्ता कट? रामराजेंच्या उमेदवारीच्या चर्चेने खळबळ, 'ती' पोस्ट व्हायरल

कधी कुठे लागू होते अचारसंहिता?

लोकसभा निवडणुकीसाठी संपूर्ण देशभरात आचारसंहिता लागू होते. विधानसभा निवडणुकांवेळी संबंधित राज्यामध्ये, तर पोटनिवडणुकीमध्ये संबंधीत मतदार संघात आचारसंहिता लागू होत असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com