Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Narayan Rane
Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Narayan Raneesakal

Ratnagiri Sindhudurg Lok Sabha : मालवणातली 'ती' सभा नारायण राणेंच्या राजकीय समारोपाचीच ठरली!

ठाकरे कुटुंबीय आणि ‘मातोश्री’वर टीका करणे हेच नारायण राणे आणि त्यांच्या मुलांचे कार्य आहे.
Summary

'ज्या ‘मातोश्री’च्या आशीर्वादाने राणेंनी सत्तेची सर्व पदे उपभोगली, तेच ‘मातोश्री’वर टीका करत असतील, तर त्यासारखे दुर्दैव नाही.'

मालवण : भाजपच्या माध्यमातून दोन दिवसांपूर्वी शहरात घेतलेली कार्यकर्त्यांची सभा ही नारायण राणेंच्या (Narayan Rane) राजकीय समारोपाचीच ठरली आहे, अशी टीका ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर (Hari Khobrekar) यांनी येथे पत्रकार परिषदेत केली.

भाजपच्या (BJP) बैठकीला एकही निष्ठावंत कार्यकर्ता वा पदाधिकारी उपस्थित नसल्याने ही सभा केवळ राणे समर्थकांचीच झाली. या सभेत राणेंनी आपल्या केंद्रीय मंत्रिपदाच्या काळात कोकणासाठी केलेल्या कामांची माहिती देणे अपेक्षित होते; मात्र त्यांनी कोकणासाठी काहीच दिलेले नसल्याने केवळ ठाकरे कुटुंबीय आणि ‘मातोश्री’वर टीका करण्यात धन्यता मानली. राणे यांनी कितीही प्रयत्न केले तरी त्यांचा पराभव करण्यासाठी निष्ठावंत शिवसैनिक सज्ज झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Narayan Rane
Kolhapur Lok Sabha : 'जसे वार येतील त्याच्या दहापटीने छत्रपती शिवराय आणि शाहू महाराजांचे मावळे वार करतील'; सतेज पाटलांचा इशारा

येथील शिवसेना (Shiv Sena) तालुका कार्यालयात खोबरेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, नितीन वाळके, शहरप्रमुख बाबी जोगी, महिला तालुका संघटक दीपा शिंदे, तालुका समन्वयक पूनम चव्हाण, शहर समन्वयक रश्मी परुळेकर, कुंभारमाठ ग्रामपंचायत सदस्या सोनाली डिचोलकर, लक्ष्मी पेडणेकर, यशवंत गावकर, नरेश हुले, अक्षय रेवंडकर, किशोर गावकर, चिंतामणी मयेकर, महेश जावकर आदी उपस्थित होते.

खोबरेकर म्हणाले, ‘‘ठाकरे कुटुंबीय आणि ‘मातोश्री’वर टीका करणे हेच नारायण राणे आणि त्यांच्या मुलांचे कार्य आहे. केंद्रीय मंत्री झाल्यानंतर कोकणात एकही विकासकाम न केल्याने येथील जनता त्यांचा पराभव करणार आहे. यापूर्वी दोनदा येथील जनतेने त्यांचा पराभव केला आहे. यावेळी ते पराभवाची हॅट्‌ट्रिक आणि खासदार विनायक राऊत हे विजयाची हॅट्‌ट्रिक साधणार आहेत. ज्यावेळी राणेंनी ‘मातोश्री’वर टीका केली, त्यावेळी निष्ठावंत शिवसैनिक अधिक आक्रमक होत गेला आहे.

Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Narayan Rane
कोल्हापुरात जन्मलेला प्रत्येक सामान्य कार्यकर्ता राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा वारसदारच आहे; काय म्हणाले मंडलिक?

ज्या ‘मातोश्री’च्या आशीर्वादाने राणेंनी सत्तेची सर्व पदे उपभोगली, तेच ‘मातोश्री’वर टीका करत असतील, तर त्यासारखे दुर्दैव नाही. राणेंना ठाकरे सेनेची चिंता सतावत आहे, मात्र त्यांना आपला पक्ष भाजपमध्ये विलीन करावा लागला, हे ते सोयीस्करपणे विसरत आहेत. ज्यांना आपला पक्ष टिकवता आला नाही, त्यांनी ठाकरे सेनेवर बोलावे, हा हास्यास्पद विषय आहे. भाजपला रिफायनरी प्रकल्प, सिडकोसाठी हा मतदारसंघ हवा आहे. येथील जनतेला त्रास होणार, असा एकही प्रकल्प आम्ही होऊ देणार नाही.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com