Tapovan Maidan Kolhapur Narendra Modi
Tapovan Maidan Kolhapur Narendra Modiesakal

Kolhapur Lok Sabha : कोल्हापुरात मोदींच्या सभेला तुफान प्रतिसाद; गर्दीचे रूपांतर मतांत करताना नेत्यांचा लागणार कस

तब्बल दहा वर्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोल्हापुरात काल तपोवन मैदानावर सभा झाली.
Summary

'मोदी यांनी कर्नाटक सरकारने मुस्लिम आरक्षणाबाबत घेतलेल्या निर्णयावर टीका करून वादाला तोंड फोडले आहे.'

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या तपोवन मैदानावर (Tapovan Maidan Kolhapur) झालेल्या सभेसाठी तुफान गर्दी झाली. आता सभेमुळे निर्माण झालेले वातावरण टिकवून ठेवण्याबरोबरच सभेतील गर्दीचे मतांत रूपांतर करण्यासाठी महायुतीच्या नेत्यांचा कस लागणार आहे.

तब्बल दहा वर्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोल्हापुरात काल तपोवन मैदानावर सभा झाली. सभेला अपेक्षित असा प्रतिसादही मिळाला. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून येऊन लोकांनी हजेरी लावली. त्यात महायुतीतील आगामी विधानसभेच्या इच्छुक उमेदवारांनीही यानिमित्ताने शक्तिप्रदर्शन केल्याचे पाहायला मिळाले. सद्य:स्थितीत कुणाला मतदान करायचे याचा ८० ते ८५ टक्के लोकांचा निर्णय झाला आहे.

Tapovan Maidan Kolhapur Narendra Modi
'मोदी गॅरंटीच्या आड येणाऱ्यांचा काटा किर्रर्र झाल्याशिवाय राहणार नाही'; मुख्यमंत्री शिंदेंचा काँग्रेसवर घणाघात

उर्वरित १५ ते २० टक्के लोक अशा गर्दीवर मतदान करतात हा अभ्यास आहे आणि हीच मते निर्णायकही असतात. तथापि आजच्या सभेनंतर प्रत्यक्ष मतदानाला अजून दहा दिवस शिल्लक आहेत, त्यामुळे यापुढील काळात हेच वातावरण टिकवून ठेवण्याबरोबरच सभेला झालेल्या गर्दीचे मतांत रूपांतर करताना नेत्यांची कसोटी लागणार आहे.

आपल्या अर्ध्या तासाच्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी देश, राज्य पातळीवरील अनेक प्रश्‍नांना हात घातला. त्याचवेळी ते स्थानिक उमेदवारांवर बोलतील अशी अपेक्षा होती; पण त्यावर त्यांनी भाष्य केले नाही. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज असो किंवा हातकणंगलेतील आघाडीच्या उमेदवारांवर थेट टीकाही केली नाही किंवा दोन उमेदवारांची तुलनाही केली. याउलट महायुतीच्या दोन उमेदवारांना मत म्हणजेच मला मत असे सांगत त्यांनी आपल्याच करिष्म्यावर जास्त भर दिला.

आतापर्यंत निवडणुकीचे दोन टप्पे देशभर झाले आहेत. त्या मतदानाच्या टक्केवारीवर नजर टाकली तर मतांचा टक्का घटला आहे. झालेल्या मतांत विशिष्ट समूहाची टक्केवारी जास्त असल्याचे पुढे आले आहे. घटलेल्या मतांच्या टक्क्यांचा धोका असल्याचा अंदाज आल्यानेच मोदी यांनी कर्नाटक सरकारने मुस्लिम आरक्षणाबाबत घेतलेल्या निर्णयावर टीका करून वादाला तोंड फोडले आहे. त्यातून आपल्याला आवश्यक असणाऱ्या मतांची टक्केवारी वाढवणे हाही भाग असू शकतो.

Tapovan Maidan Kolhapur Narendra Modi
Satara Lok Sabha : शिंदेंना अटक केल्यास राज्यभर आंदोलन करणार; शरद पवारांचा थेट इशारा

दक्षिणेच्या राज्यात एकाच टप्प्यात मतदान घेण्यात आले आहे. त्यातून काँग्रेसला दक्षिणेचा मिळून स्वतंत्र देश करण्याचा नवा आरोप त्यांनी केला, त्यातून देशातील बेरोजगारी, महागाई, महिला सुरक्षितता या मुद्द्यांकडे दुर्लक्षच केले. सद्य:स्थितीत राहुल गांधींविरुद्ध नरेंद्र मोदी असा वाद दिसत नाही. हा वाद पुढे आला तर त्यात मोदीच सरस ठरतात. विरोधी आघाडीने पंतप्रधान पदाचा उमेदवारच जाहीर केलेला नाही, त्यामुळेच देशात दरवर्षी नवा पंतप्रधान विरोधकांकडून दिला जाईल, असा आरोप मोदी यांच्याकडून आज करण्यात आला. त्याला कर्नाटक पॅटर्नची जोड देऊन विरोधकांच्या संविधान बचाव, लोकशाही बचाव या घोषणेला छेद देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.

काँग्रेस, सेना नेतृत्‍वावर निशाणा

थेट उमेदवारांची तुलना किंवा काँग्रेस उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांना डिवचले तर ते अंगावर येऊ शकते, त्यामुळे मोदी यांनी संपूर्ण भाषणात उमेदवारांवर थेट आरोप न करता काँग्रेस व शिवसेनेच्या नेतृत्‍वावरच टीका करणे पसंत केले. दोन्ही मतदारसंघांत शिवसेनेचे उमेदवार आहेत, पण शिवसेना फुटलेली आहे आणि खरी शिवसेना कोणाची याची जाणीवही मोदी यांना आहे. शिवसेनेतील फुटीतून उद्धव ठाकरे यांना सहानुभूती असल्याचे चित्र निर्माण झाले आहे, त्यावरील लक्ष विचलित करण्यासाठी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेऊन त्यांना उद्धव ठाकरेंची भूमिका आवडली असती का? असा प्रश्‍न त्यांच्याकडून उपस्थित केला जात आहे. यातून काँग्रेससोबत जाण्याच्या उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेला छेद देण्याचा प्रयत्न मोदी यांनी केला.

Tapovan Maidan Kolhapur Narendra Modi
Satara Lok Sabha : 'मोदींची लाट सुनामीसारखी, लाटेत शरद पवारांचे सर्व उमेदवार पराभूत होणार'; बावनकुळेंना विश्वास

फुटबॉलवर भाष्य अन् इशारा

पंतप्रधान मोदी यांनी फुटबॉलवर भाष्य करून स्थानिक वादावर बोट ठेवले. कोल्हापूरच्या फुटबॉलचा उल्लेख करून स्थानिक फुटबॉल संघांच्या वादावर फुंकर घालून विरोधकांना आजच्या सभेत इशारा दिला. प्रचाराला फुटबॉलची जोड देऊन आताच राष्ट्रीय लोकशाही आघाडी पुढे असल्याचे सांगून त्यांनी विरोधकांनाही चपराक दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com