Loksabha Election 2024 : शिवसेनेतील दोन गटांत पाच ठिकाणी होणार चुरस

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेही आठ उमेदवारांची पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. या आठपैकी पाच ठिकाणी ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आमने-सामने असणार आहेत.
Loksabha Election 2024
Loksabha Election 2024sakal

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेही आठ उमेदवारांची पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. या आठपैकी पाच ठिकाणी ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आमने-सामने असणार आहेत. त्यामुळे येथे लढत चुरशीची होण्याची शक्यता आहे.

हिंगोली लोकसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदेंनी विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. पाटील यांच्याविरोधात ठाकरेंच्या पक्षाकडून हदगावचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर लढणार आहेत.

Loksabha Election 2024
Gadchiroli Chimur Loksabha Constituency : लढत कमळविरुद्ध पंजातच

बुलडाण्यात शिंदेंनी खासदार प्रतापराव जाधव यांना पुन्हा रिंगणात उतरवले आहे. त्यांच्याविरोधात ठाकरेंकडून नरेंद्र खेडेकर लढणार आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघातून ठाकरेंनी संजोग वाघेरे यांना मैदानात उतरवले आहे.

वाघेरेंविरोधात शिंदेंनी विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून राहुल शेवाळे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर उद्धव ठाकरे यांनी या लोकसभा मतदारसंघात अनिल देसाई यांना मैदानात उतरवले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com