Vijay Wadettiwar : राज ठाकरेंचे हात दगडाखाली : वडेट्टीवार

‘‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका आजपर्यंत कधीच स्थिर राहिली नाही. आताही त्यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे, याचा अर्थ त्यांचे हात कुठेतरी दगडाखाली अडकले आहेत, अशी शंका येते,’
Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwar sakal

पुणे : ‘‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका आजपर्यंत कधीच स्थिर राहिली नाही. आताही त्यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे, याचा अर्थ त्यांचे हात कुठेतरी दगडाखाली अडकले आहेत, अशी शंका येते,’’ अशी टिप्पणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली. तर हुतात्मा हेमंत करकरे यांच्याबद्दलचे वक्तव्य माझे नसून माजी पोलिस अधिकारी एस. एम. मुश्रीफ यांच्या पुस्तकातील आहे, असेही ते म्हणाले.

पुणे लोकसभा निवडणुकीतील इंडिया आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ आयोजित पत्रकार परिषदेत वडेट्टीवार बोलत होते. यावेळी सहप्रभारी आशिष दुवा, प्रचारप्रमुख मोहन जोशी, प्रवक्ते गोपाळ तिवारी, गुजरात काँग्रेस प्रवक्त्या प्रगती अहीर, प्रा. प्रकाश सोनवणे, अजित दरेकर, रफिक शेख आदी उपस्थित होते.

राज ठाकरे यांनी नारायण राणे यांच्या प्रचारार्थ कोकणात सभा घेतली, त्यावर विचारले असता वडेट्टीवार म्हणाले, ‘‘खरेतर राज ठाकरे अशा जुमलेबाजांबरोबर राहणारे नाहीत. परंतु त्यांचे हात कुठेतरी दगडाखाली अडकले असावेत, अशी शंका येते. राणे हे माझे नेते होते. वारंवार पक्ष बदलणे योग्य नाही. मी गेल्या १८ वर्षांपासून काँग्रेसमध्येच आहे. गद्दारी करणाऱ्यांना महाराष्ट्राने कायमच गाडले. यापुढेही तसेच होणार आहे.’’

Vijay Wadettiwar
Loksabha Election Voting : मतदानासाठी उद्या कामगारांना पगारी सुट्टी

वडेट्टीवार म्हणाले...

  • महाराष्ट्रात इंडिया आघाडी ३८ जागा जिंकेल

  • महाराष्ट्राच्या पवित्र भूमीतूनच भाजपच्या सत्तेला लगाम बसेल

  • २०१४ मध्ये विकासाच्या नावावर, २०१९ मध्ये हुतात्म्यांच्या नावावर अन् आता रामाच्या नावावर मते मागण्याची भाजपवर वेळ

  • पराजय दिसतोय म्हणूनच विकासाऐवजी मुस्लिम आणि भारत-पाकिस्तान मुद्दे भाजपने प्रचारात काढले

  • दहशतवादी कसाबला बिर्याणी खाऊ घातली जात असल्याचे आरोप ॲड. उज्ज्वल निकम यांनी केले होते, खरी परिस्थिती उघडकीस आल्यावर निकम यांनी माफी मागितली, निकम खोटारडे आहेत

  • हुतात्मा हेमंत करकरे यांच्याबाबत मुश्रीफ यांच्या पुस्तकात दिलेली माहिती मी सांगितली, ती माहिती माझी स्वत:ची नाही

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com