मुंबई, पुणेच नव्हे तर येथेही होणार एमपीएससीची परीक्षा

Akola News Not only Mumbai, Pune but also MPSC exams will be held here, implementation of the suggestion of Assembly Speaker Nana Patole
Akola News Not only Mumbai, Pune but also MPSC exams will be held here, implementation of the suggestion of Assembly Speaker Nana Patole

अकोला ः महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून १३ सप्टेंबरला होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशभरात १३ सप्टेंबरला नीट परीक्षा होणार असल्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ही राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

विशेष म्हणजे ही परीक्षा २० सप्टेंबरला होईल असंही आयोगाने स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने याबाबत अधिकृत संकेतस्थळावर पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. त्यासोबतच राज्यभरातील परीक्षाकेंद्रांबाबत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष सतिश गवई यांच्याशी परीक्षा उमेदवारांच्यावतीने चर्चा केली.

कोरोना परिस्थितीमुळे फक्त मुंबई आणि पुणे येथे परीक्षा ठेवल्यास राज्याच्या अन्य भागातील स्पर्धा परीक्षेतील उमेदवारांना रेल्वे सेवा बंद असल्याने परीक्षास्थळी पोहचणे शक्य होणार नाही. 

ही वस्तुस्थिती निदर्शनास आणत ही परीक्षा सर्व महसूल विभागीय केंद्रांवर घेण्यात यावी अशी सूचना केली.

अखेर 20 सप्टेंबरए 2020 रोजी होणारी ही परीक्षा मुंबईए पुणे यांसह राज्यातील सर्व महसूल विभागीय केंद्रांवर घेतली जावी ही सूचना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मान्य केली आहे.

यामुळे स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.  विधानसभा अध्यक्षए नाना पटोले यांनी यासंदर्भात पुढाकार घेवून परीक्षेला बसलेल्या उमेदवारांची अडचण दूर केल्याने राज्याच्या सर्व विभागातून या निर्णयाचे स्वागत होत आहे  अनेक उमेदवारांनी यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष यांचे आभार मानले.

कोरोनामुळे होणा-या अनेक परीक्षा रद्द केल्या आहेत, तसेच अनेक परीक्षा पुढे ढकलल्याचं आपण पाहतोय. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तिस-यांदा ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

२३ डिसेंबर २०१९ रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहीरातीनुसार, राज्य सेवेची पूर्वपरीक्षा ५ एप्रिल २०२० रोजी घेण्याचे निश्चित केले होते. मात्र कोरोनाचा संसर्ग अधिक असल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली.

त्यामुळे ही परीक्षा १७ जूनला १३ सप्टेंबरला होईल अस जाहीर करण्यात आलं होतं. पण राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट) १३ सप्टेंबरला असल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली.

कोरोनाचा प्रादुर्भाव आणि परीक्षेला बसणा-या उमेदवारांची संख्या लक्षात घेऊन ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

एमपीएससीने आयोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा २० सप्टेंबर रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आल्याचे एमपीएससीने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कर्मचारी आणि आयोगाकडून सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाय योजना करण्यात आल्या आहेत असं एमपीएसीकडून स्पष्ट केलं आहे.

20 सप्टेंबरए 2020 रोजी होणारी ही परीक्षा मुंबईए पुणे यांसह राज्यातील सर्व महसूल विभागीय केंद्रांवर घेतली जावी ही सूचना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मान्य केली आहे. यामुळे स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com