पहिल्या टप्प्यात राज्यात २८५ ठिकाणी कोरोनाचे लसीकरण - आरोग्यमंत्री राजेश टोपे

Corona Vaccination In Jalna
Corona Vaccination In Jalna

जालना : राज्यात २८५ ठिकाणी पहिल्या टप्प्यातील २८ हजार ५०० आरोग्य योद्धांना कोरोना लसीकरण केले जात आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी (ता.१६) जालना येथील कोरोना लसीकरण केंद्र येथे पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
शनिवारपासून संपूर्ण देशासह राज्यात कोरोना विषाणूवर शोधलेली कोरोना लस आरोग्य योद्ध्यांना देण्यास सुरूवात झाली आहे. जालना येथे चार केंद्रांवर कोरोना लसीकरण होणार आहे.

जालना जिल्हा रूग्णालय येथील कोरोना लसीकरण केंद्रावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत कोरोना लसीकरण होत आहे. याप्रसंगी श्री.टोपे म्हणाले, की कोरोना विषाणूवर आता लसीच्या माध्यमातून उत्तर सापडले आहे. मात्र, त्याचे उच्चाटन झाले नाही. कोरोनावर आलेल्या लसीच्या चाचण्या पूर्ण झाल्यानंतर लसीकरणाचा निर्णय घेण्यात आला असून ही लस सुरक्षित आहे.

पुढल्या एक महिन्याच्या कालवधीत लसीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण करण्याचा मानस आहे. तसेच ज्याला दोन वेळाच्या खाण्याची भ्रांत आहे, त्यांना ही कोरोना लस मोफत मिळावी अशी आमची इच्छा असून पुढील तीन ते साडेतीन महिन्यानंतर सामान्य नागरिकांसाठी कोरोनाची  उपलब्ध होईल असे ही आरोग्य मंत्री टोपे यांनी यावेळी म्हटले.

नरेंद्र मोदींनी साधला संवाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात येथे व्हीसीव्दारे संवाद साधत कोरोना लसीकरणाचे उद्घाटन केले. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विवेक खतगावकर यांच्या निवडक डॉक्टर, नर्स, अधिकारी या व्हीसीला उपस्थित होते.
 

Edited - Ganesh Pitekar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com