आता महाराष्ट्रात गुंतवणूक वाढणार; मुख्यमंत्र्यांची अपेक्षा

टीम ई-सकाळ
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

कार्पोरेट टॅक्स १५ टक्क्यांवर आणल्याबद्दल अर्थमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन. या निर्णयामुळे देशात विशेषतः महाराष्ट्रात गुंतवणूक वाढेल, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

मुंबई : कार्पोरेट टॅक्स १५ टक्क्यांवर आणल्याबद्दल अर्थमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन. या निर्णयामुळे देशात विशेषतः महाराष्ट्रात गुंतवणूक वाढेल, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांनी विशेष पत्रकार परिषद घेऊन या निर्णयाचे फायदे कसे होतील, याची माहिती दिली.

मला युतीची तेवढीच चिंता : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री म्हणतात...

  1. दहा बँकांच्या विलिनीकरणाचा निर्णय महत्त्वाचा
  2. बँकांचा खर्च आणि तोटा कमी होण्यास मदत होणार
  3. गेल्या ९ वर्षांतील सर्वांत कमी रेपो रेट आहे
  4. रेपोरेट जसा कमी होईल, त्याचा फायदा ग्राहकांना 

राणेंचा स्वाभिमान टिकून, भाजप प्रवेशाचा मुहूर्त टळला

महाराष्ट्राला होणार फायदा
मुख्यमंत्री म्हणाले, ‘कार्पोरेट टॅक्स कमी करण्याचा निर्णय स्वागतार्ह. जगातील स्पर्धेत आपण कोठे तरी मागे पडतो, अशी मानसिकता झाली होती. पण, निर्मला सीतारामन यांच्या घोषणांचा सर्वांत मोठा लाभार्थी हा महाराष्ट्र असेल. जगात चीन-अमेरिका यांच्यात ट्रेड वॉर सुरू आहेत. याचा फायदा भारताला होऊ शकतो. अनेक कंपन्या भारतात येऊ शकतात. त्याला कार्पोरेट टॅक्स हा अडथळ होता. हा टॅक्स कमी करण्यासाठी सगळ्या अर्थतज्ज्ञांनी आग्रह धरला होता. त्यामुळे सीतारामन यांचा निर्णय खूपच बोल्ड म्हणता येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सीतारामन यांनी ही हिम्मत दाखवल्यामुळे त्याचा फायदा आता उद्योग क्षेत्राला होणार आहे. महाराष्ट्र हे देशाचं इंडस्ट्रियल हब आहे. महाराष्ट्रात गुंतवणूक वाढीला आता मदत होईल.’ वाचलेला टॅक्स पुन्हा गुंतवणूक होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘आता १ नोव्हेंबर २०१९पासून ज्या कंपन्या गुंतवणूक करतील आणि २०२३पर्यंत उत्पादन सुरू करतील, त्या कंपन्यांना कायमस्वरूपी १५ टक्के कार्पोरेट टॅक्स लागू होणार आहे. ही कंपन्यांसाठी खूप आनंदाची बाब आहे. परिणामी गुंतवणूक वाढून रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील.’


    स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
    Web Title: cm devendra fadnavis press conference mumbai corporate tax nirmala sitharaman