मुख्यमंत्री म्हणतात, ‘युतीची मलाही तेवढीच चिंता’

टीम ई-सकाळ
Monday, 23 September 2019

मुंबई : विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या तरी, भाजप-शिवसेना युतीची घोषणा झालेली नाही. त्यामुळं युतीच्या निर्णयाविषयी सगळ्यांना उत्सुकता आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘सगळं काही योग्य वेळी करू’, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई : विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या तरी, भाजप-शिवसेना युतीची घोषणा झालेली नाही. त्यामुळं युतीच्या निर्णयाविषयी सगळ्यांना उत्सुकता आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘सगळं काही योग्य वेळी करू’, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

राणेंचा ‘स्वाभिमान’ टिकून; भाजप प्रवेश टळला

थोडा धीर धरा
युतीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले, ‘भाजप-शिवसेना युतीची जेवढी चिंता तुम्हाला आहे तेवढी मलाही आहे. युतीबाबत योग्यवेळी निर्णय घेऊ. तसेच माजी मुख्यमंत्री नारायण राणेंच्या भाजप प्रवेशावरूनही चर्चा सुरू आहेत. त्यावरही योग्य वेळी निर्णय घेऊ. थोडा धीर धरा.’ गेल्या काही दिवसांपासून युती होणार की नाही, अशी चर्चा सुरू आहे. भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री काल मुंबई दौऱ्यावर होते. त्या दौऱ्यात अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट होईल, अशी अपेक्षा होती. पण, ही भेट झाली नाही. भाजपच्या नेत्यांनी युतीचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस, पक्षाचे अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतली, असे वारंवार स्पष्ट केले आहे.

स्मारकांवरून खासदार सुजय विखे-पाटलांची मोदींवर टीका; व्हिडिओ व्हायरल

आरे संरक्षित जंगल नाही
मुंबईतील आरे येथील मेट्रो कारशेडवरून शिवसेना आणि मनसेने आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. त्यावरही मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले. मुख्यमंत्री म्हणाले, ‘आरेच्या जंगला संदर्भात मुंबई हायकोर्ट, हरित लवाद आणि सर्वोच्च न्यायालय या तिन्ही ठिकाणी निकाल लागले आहेत. आरे हे संरक्षित जंगल नाही, हे सगळ्यांनीच मान्य केले आहे. ती खासगी जमीन आहे. आता काही जण कारशेड संदर्भात आंदोलन करत आहे. कोर्टात याचिकाही दाखल करण्यात आल्या आहेत.’

‘हाउडी मोदी’ने पाकिस्तानची हवा केली गुल; आंदोलन फ्लॉप

राष्ट्रवादावर बोलतच राहणार
सरकार राष्ट्रवादावर बोलत आहे, या संदर्भातील प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले, ‘जगभरातील अनेक देशांमध्ये राष्ट्रवादावर बोलले जाते. युरोपमधील देशांमध्येही राष्ट्रवाद आहे. त्यात वाईट काय आहे? आम्हाला त्यात चुकीचे काहीच वाटत नाही. यापुढेही आम्ही राष्ट्रवादावर बोलत राहू.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cm devendra fadnavis press conference mumbai metro yuti shivsena