सस्पेन्स फुटणार; अजित पवार मीडियाशी बोलणार

टीम ई-सकाळ
शनिवार, 28 सप्टेंबर 2019

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काल तडकाफडकी आमदारकीचा राजीनामा दिला. तेव्हापासून ते अजित पवार नॉटरिचेबल होते. परंतु, शरद पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर आता अजित पवार पत्रकार परिषद घेऊन, आपली भूमिका मांडणार आहेत.

‘...म्हणून अजित पवार यांनी दिला राजीनामा’

उदयनराजेंविरोधात पृथ्वीराज चव्हाण यांनी लढावं : शरद पवार​

मुंबईतील शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी आज दुपारी, अजित पवार आणि शरद पवार यांची दीर्घ बैठक झाली. त्या बैठकीला अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवारदेखील उपस्थित होते. या बैठकीनंतर अजित पवार सिल्वर ओकमधून बाहेर पडले. अजित पवार यांच्याशी संवाद साधण्यासाठी सकाळपासून सिल्वर ओकच्या बाहेर उभ्या असलेल्या मीडियाने अजित पवार यांना घेराव घातला. त्यावेळी अजित पवार यांनी, ‘थोड्या वेळात मी धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेणार आहे.’ असे स्पष्ट केले. मीडियाच्या प्रतिनिधींनी कधी पत्रकार परिषद घेणार, याविषयी आग्रह केल्यानंतर अजित पवार म्हणाले, ‘मला धनंजयशी बोलावं लागेल. कधी पत्रकार परिषद घेणं शक्य आहे हे धनंजय मुंडे यांना विचारावं लागेल. त्यानंतरच कधी पत्रकार परिषद होईल, हे सांगेन.’

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ncp leader ajit pawar to take press conference mumbai sharad pawar