आदित्य ठाकरेंनी खड्ड्यांचे खापर फोडले केंद्रावर; काय म्हणाले ठाकरे?

aditya thackeray
aditya thackeray

ठाणे : मुंबई, कल्याण-डोबिंवली, नागपूर मुंबई-गोवा महामार्ग, अशा अनेक ठिकाणी रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचा विषय सध्या सोशल मीडियावर गाजत आहे. मराठी कलाकरांनीही सोशल मीडियावर याविषयी आवाज उठवला आहे. आता केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी या रस्त्यांचे खापर केंद्रावर फोडले आहे.

आदित्य ठाकरे म्हणतात, 'पुन्हा भगवाच'
उल्हासनगरमध्ये राजकीय दौऱ्यासाठी आलेले युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांना विचारण्यात आले असता त्यांनी सदोष टेंडर प्रक्रियेकडे बोट केले. आदित्य ठाकरे म्हणाले, ‘महाराष्ट्रात सगळीकडेच रस्ते खराब झाले आहेत. मी नुकताच गोव्याहून आलो आहे. गोव्यातही रस्त्यांसाठी आंदोलने सुरू आहेत. पण, आता केंद्र सरकारने टेंडर प्रक्रियेत मोठा बदल करण्याची गरज आहे. कालही मी यावर हीच प्रतिक्रिया दिली होती.’ महाराष्ट्रात पुन्हा भगवा फडकेल, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला. युतीविषयी बोलता आदित्य ठाकरे म्हणाले, ‘जनआशीर्वाद यात्रेचे ठिकठिकाणी चौकात स्वागत होत आहे. यासाठीच ही जनआशीर्वाद यात्रा आयोजित केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा भगवा फडकेल, असा विश्वास वाटतो आहे.’ युती होणार की नाही, यावरही ‘महाराष्ट्रात पुन्हा भगवा फडकेल,’ असेच उत्तर आदित्य ठाकरे यांनी दिले.

सोशल मीडियावर खड्ड्यांचा विषय
सध्या महाराष्ट्रात महानगरांमधील खड्ड्यांचा विषय गाजतो आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेत्यांनी सोशल मीडियावर या खड्डयांविषयी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. यात मकरंद अनासपुरे, जितेंद्र जोशी, प्रशांत दामले, पुष्कर श्रोत्री यांनी सोशल मीडियावर व्यक्त होतानाच, वृत्तवाहिन्यांवरही याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. खड्ड्यांमुळे अनेकांना अपघातात जीव गमवावा लागत असल्यामुळे हा विषय चव्हाट्यावर आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com