Video : राजू शेट्टी म्हणतात, 'आम्हाला गृहित धरू नका'; आघाडीत बिघाडी?

टीम ई-सकाळ
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

पुणे : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीमध्ये झालेले जागावाटप आघाडीतील महत्त्वाचा मित्रपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मान्य नसल्याचे आज, माजी खासदार आणि संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी सांगितले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने १२५-१२५ जागा वाटून घेऊन ३८ जागा मित्रपक्षांना ठेवल्या आहेत.

पुणे : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीमध्ये झालेले जागावाटप आघाडीतील महत्त्वाचा मित्रपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मान्य नसल्याचे आज, माजी खासदार आणि संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी सांगितले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने १२५-१२५ जागा वाटून घेऊन ३८ जागा मित्रपक्षांना ठेवल्या आहेत.

निवडणूक आयोग देवदूत नाही : बाळा नांदगावकर

असे झाले जागा वाटप
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख माजी खासदार राजू शेट्टी आज पुण्यात होते. कोथरूड येथे यशवंतराव चव्हाण सभागृहात स्वाभिमानी शेतकरी संघटना व प्रजा लोकशाही परिषदेचा मेळावा झाला. त्या वेळी राजू शेट्टी बोलत होते. आजचा मेळावा हा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची रणनीती तयार करण्यासाठी आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यानंतर राजू शेट्टी यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी आघाडीतील जागा वाटपावर नाराजी व्यक्त केली. काँग्रेस-राष्ट्रवादीने प्रत्येकी १२५ जागा लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन केली होती. यात त्यांनी मित्र पक्षांसाठी ३८ जागा ठेवल्या आहेत. पण, राजू शेट्टी यांनी या जागा वाटपाला आक्षेप घेतला आहे.

अशी आहे, काँग्रेसची पहिली संभाव्य यादी

काय म्हणाले राजू शेट्टी?
राजू शेट्टी म्हणाले, ‘देशातील लोकशाही धोक्यात आहेत. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेच्या विरोधात उभे राहण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. पण, काँग्रेस-राष्ट्रवादीने आम्हाला गृहीत धरू नये. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांशी माझे बोलणे झाले आहे. आघाडीतील दोन्ही मोठ्या पक्षांनी छोट्या पक्षातील नेत्यांना संधी द्यावी, आघाडीच्या जोरावर हे नेते निवडून येतील. आघाडीच्या माध्यमातून सोशल इंजिनीअरिंग होऊ शकते. जर, या घटकाला संधी मिळाली नाही तर, भाजप-शिवसेने विरोधातील या लढाईला आमच्या दृष्टीने फारसा अर्थ राहणार नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांनी याचा विचार करावा, असे माझे मत आहे.’ दरम्यान, ईव्हीएमच्या मुद्द्यावरही राजू शेट्टी यांनी भाष्य केले. ईव्हीएमचा मुद्दा असला तरीही आमची लढायची तयारी आहे, असेही शेट्टी म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vidhan sabha 2019 raju shetti statement on alliance with congress ncp pune