esakal | उपमुख्यमंत्रिपद अजित पवारांना नाही? राष्ट्रवादी 'या' नेत्याला देणार संधी!
sakal

बोलून बातमी शोधा

ncp leader ajit pawar may not get deputy cm post in maharashtra

ज्याअर्थी शरद पवार यांची अनुमती नाही, त्या अर्थी अजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्री होणे शक्य नाही, असं राजकीय वर्तुळात बोललं जातंय. 

उपमुख्यमंत्रिपद अजित पवारांना नाही? राष्ट्रवादी 'या' नेत्याला देणार संधी!

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

मुंबई : राज्यात सध्या मंत्रिमंडळ विस्ताराची उत्सुकता आहे. कोणत्या खात्यावर कोणत्या नेत्याची मोहोर लागणरा, याचीच सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. त्यातही उपमुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार? याविषयी सर्वाधिक उत्सुकता आहे. उपमुख्यमंत्रिपदाची खुर्ची राष्ट्रवादीकडेच राहणार हे निश्चित असलं तरी, त्या खुर्चीवर कोण विराजमान होणार याविषयी सस्पेन्स कायम आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोण बनेगा उपमुख्यमंत्री?
राष्ट्रवादी काँग्रेसमधून उपमुख्यमंत्रिपदासाठी अजित पवार  Ajit Pawar यांचे नाव सुरुवातीपासून आघाडीवर होते. परंतु, आता त्यांचे नाव मागे पडल्याची माहिती पक्षातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्यांच्या जागी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि सध्याचे मंत्रि जंयत पाटील यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रं येण्याची शक्यता आहे. त्यामुळं अजित पवार यांना अर्थ किंवा नगरविकास खातं मिळेल, अशी शक्यताही सूत्रांनी व्यक्त केली आहे. त्यातही अर्थ खातं आणि उपमुख्यमंत्रिपद जयंत पाटील Jayant Patil यांच्याकडे ठेवून, राष्ट्रवादी अजित पवारांना केवळ नगरविकास खात्याचीच जबाबदारी देईल, अशी दाट शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

आणखी वाचा - झारखंडमध्येही भाजपचा पराभव; काय चुकलं?

शरद पवारांची नाराजी?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून सध्या उपमुख्यमंत्रिपदासाठी अजित पवार यांच्याच नावाला पसंती आहे. नेत्यांनी अजित पवार यांचेच नाव पुढे केले असले तरी, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र, अजित पवार यांच्या नावाला पसंती दिलेली नाही, असं पक्षातील विश्वसनीय सूत्रांनी सांगितलंय. ज्याअर्थी शरद पवार Sharad Pawar यांची अनुमती नाही, त्या अर्थी अजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्री होणे शक्य नाही, असं राजकीय वर्तुळात बोललं जातंय. 

आणखी वाचा - उद्याच होणार मंत्रिमंडळ विस्तार, कोणाला मिळणार संधी?

बंडखोरीमुळे नाव मागे
अजित पवार यांनी भाजपचे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदारांना हाताशी धरून त्यांनी बंड केले होते. परंतु, अवघ्या तीन दिवसांत अजित पवार पुन्हा स्वगृही परतले. अर्थात त्यांच्या या बंडखोरीच्या निर्णयामुळेच त्यांना शिवाजी पार्कवरील शपथविधी सोहळ्यात मंत्रिपदाची शपथ घेता आली नाही आणि त्याच कारणामुळं त्यांच्या हातातून उपमुख्यमंत्रिपद जाण्याची शक्यता असल्याचं बोललं जातंय.