esakal | निर्यातक्षम शेतमालाच्या ऑनलाईन नोंदणीसाठी १ लाख हेक्टरचे उद्दिष्ट
sakal

बोलून बातमी शोधा

exoprtable farming products

निर्यातक्षम शेतमालाच्या ऑनलाईन नोंदणीसाठी लाख हेक्टरचे उद्दिष्ट

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक :युरोपियन देशांनी कीडनाशक उर्वरित अंशमुक्तीची हमी अट घातल्याने २००४-०५ पासून ‘अपेडा‘च्या माध्यमातून ऑनलाइन नोंदणीची प्रणाली सुरु करण्यात आली. ग्रेपनेट मध्ये द्राक्ष बागांची, आंब्यासाठी मॅगोनेट, डाळिंबासाठी अनारनेट, भाजीपाला व केळीसाठी व्हेजनेट, तर संत्री, मोसंबी, लिंबूसाठी सिट्रसनेट, कांद्यासाठी ओनियननेट, बोर, लिची, अननस, कवठ आदी फळांसाठी ऑदरफ्रूटनेट ही प्रणाली ‘अपेडा'च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यंदा राज्यातील फळे आणि भाजीपाल्याच्या १२ लाख ३९ हजार ४४४ हेक्टर क्षेत्रापैकी एक लाख हेक्टर ऑनलाइन नोंदणीचे उद्दिष्ट कृषी आयुक्तालयाने निश्‍चित केले आहे. (1-lakh-hectare-target-for-online-registration-of-exportable-farming-products-agriculture)

ऑनलाइन नोंदणीचा कालावधी निश्‍चित

गेल्या वर्षी ग्रेपनेट, अनारनेट, मँगोनेट, व्हेजनेट, सिट्रसनेटच्या माध्यमातून ६३ हजार ३४८ हेक्टर क्षेत्राची नोंदणी झाली होती. त्यात सर्वाधिक ३७ हजार ७८१ हेक्टरची नोंदणी नाशिक जिल्ह्यातून झाली. त्यापैकी द्राक्षांचे क्षेत्र ३७ हजार ५८७ हेक्टर असून अनारनेटचे ४७, मँगोनेटचे ११९, तर व्हेजनेटचे २८ हेक्टर क्षेत्र आहे. २०२१-२२ साठी सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना नोंदणी अधिकारी म्हणून नेमणूक देण्यात आली आहे. फळे आणि भाजीपाला पिकांच्या नोंदणीसाठी ३४ जिल्ह्यासाठी ऑनलाइन निर्यातक्षम बागांच्या नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. द्राक्षे, आंबा, डाळिंब, भाजीपाला, संत्री, मोसंबी, लिंबू या पिकांच्या नोंदणी आणि प्रशिक्षणाच्या कामासाठी कृषी उपसंचालक समन्वय अधिकारी म्हणून काम पाहतील. सर्व कृषी सहाय्यक, पर्यवेक्षक, अधिकारी हे तपासणी अधिकारी म्हणून काम पाहतील. ग्रेपनेटसाठी नोव्हेंबर २०२१ ते जानेवारी २०२२, मँगोनेटसाठी डिसेंबर २०२१ ते मार्च २०२२, तर अनारनेट, व्हेजनेट, सिट्रसनेट, बिलवाइन नेट, ओनियननेट, ऑदरफ्रूटनेट साठी वर्षभर ऑनलाइन नोंदणीचा कालावधी निश्‍चित करण्यात आला आहे, अशी माहिती फलोत्पादन संचालक कैलास मोते यांनी दिली.

हेही वाचा: शेतकरी उत्पादक कंपन्या शेतकऱ्यांना समृद्ध करतील : दादा भुसे

सप्टेंबरमध्ये शेतकऱ्यांचे प्रशिक्षण

जागतिक आणि स्थानिक बाजारपेठेतील ग्राहकांना फळे आणि भाजीपाला निर्यातक्षम दर्जाचे व कीटकनाशकमुक्त मिळावा म्हणून राज्यातील जिल्हानिहाय नोंदणीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जुलै आणि ऑगस्टमध्ये गावस्तरावर खास मोहिम राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत २०२१-२२ मध्ये नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी जिल्हानिहाय आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार सप्टेंबर २०२१ पासून प्रशिक्षण वर्ग घ्यायचे आहे. त्यामध्ये कीड व रोगाच्या नियंत्रणासाठी ‘लेबल क्लेम' औषधांच्या वापराबाबत आणि त्याच्या नोंदणी ठेवणे, कीडरोगमुक्त क्षेत्र आदीबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. राज्यात द्राक्षांचे १ लाख ३ हजार ८० हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी ५९ हजार हेक्टर नोंदणीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. गेल्यावर्षी ४५ हजार ३५३ हेक्टरची नोंदणी झाली होती. आंब्याच्या १ लाख ६३ हजार ८०७ हेक्टरपैकी १९ हजार हेक्टरचे नोंदणी उद्दिष्ट असून गेल्यावर्षी ११ हजार ९९५ हेक्टरची नोंदणी झाली होती. १ लाख ६० हजार १०४ हेक्टरपैकी ८ हजार हेक्टर डाळिंबाची नोंदणी अपेक्षित असून गेल्यावर्षी १ हजार ५१८ हेक्टरची नोंदणी झाली होती. भाजीपाल्याच्या ६ लाख ६८ हजार २७३ हेक्टरपैकी ९ हजार ५०० हेक्टर नोंदणीचे उद्दिष्ट असून गेल्यावर्षी २ हजार ६३९ हेक्टरची नोंदणी झाली होती. संत्री, मोसंबी, लिंबूचे क्षेत्र १ लाख ४४ हजार १८० हेक्टर असून त्यापैकी साडेचार हेक्टरची नोंदणी करणे अपेक्षित आहे. गेल्यावर्षी १ हजार ८४३ हेक्टरची नोंदणी झाली होती.

हेही वाचा: कांदा चाळींवर यूरियाचे संकट! विकृतपणामुळे शेतकऱ्यांनी घेतला धसका

फळे-भाजीपाला ऑनलाइन नोंदणीची स्थिती

(क्षेत्र हेक्टरमध्ये दर्शवते)

जिल्ह्याचे नाव यंदाचे उद्दिष्ट गेल्यावर्षीची नोंदणी जिल्ह्याचे नाव यंदाचे उद्दिष्ट गेल्या वर्षीची नोंदणी

ठाणे १ हजार ४०० ८३१ जालना १ हजार १४१

पालघर ५४० ४३ परभणी १८० ०

रायगड २ हजार ६०० २ हजार ३७ लातूर ४३० १३१

रत्नागिरी १० हजार ४५ ७ हजार ९० उस्मानाबाद १ हजार १३० ४५५

सिंधुदुर्ग ३ हजार १५० १ हजार ७३२ नांदेड १७० ११

नाशिक ४६ हजार ३४० ३७ हजार ७८१ बुलढाणा ३३० १२०

जळगाव ६३० २१० अमरावती १ हजार ७१० ७३५

धुळे ८२० १४६ वाशिम १८५ ३७

नंदूरबार ५०० ० भंडारा १ हजार ३०० ६५९

पुणे ३ हजार २५० १ हजार ७१४ चंद्रपूर ७० ७

नगर २ हजार १५० ७२३ गडचिरोली ३३० ९९

सोलापूर ६ हजार ५०० २ हजार १०३ गोंदिया १५५ ९

सातारा १ हजार ७२५ ७८१ हिंगोली ५५ ०

सांगली ७ हजार ८७५ ४ हजार ३४० वर्धा ५९५ २५१

कोल्हापूर ४५५ २० यवतमाळ १०० ०

औरंगाबाद ९१० ४५ नागपूर २ हजार ५० ९९३

बीड ७७० १४१ अकोला ३६० ४७

(1-lakh-hectare-target-for-online-registration-of-exportable-farming-products-agriculture)

loading image