esakal | शेतकरी उत्पादक कंपन्या शेतकऱ्यांना समृद्ध करतील : कृषिमंत्री दादा भुसे
sakal

बोलून बातमी शोधा

dada bhuse

शेतकरी उत्पादक कंपन्या शेतकऱ्यांना समृद्ध करतील : दादा भुसे

sakal_logo
By
प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने समृद्ध करण्यासाठी राज्य शासनाने शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यावर भर दिला आहे. याच माध्यमातून शेतकऱ्यांचे हित जोपासले जाईल, असा विश्‍वास कृषिमंत्री दादा भुसे यांनी रविवारी (ता. ११) येथे व्यक्त केला. (Farming-manufacturing-companies-enrich-farmers-minister-Dada-Bhuse-nashik-agriculture-news)

द्रवरुपी युरिया शेतकऱ्यांसाठी चांगला पर्याय

शासकीय कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयात झालेल्या आढावा सभेत ते बोलत होते. श्री. भुसे म्हणाले, की कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ गटशेती व शेतकरी उत्पादक कंपन्यांसह महिला शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने शेतकऱ्यांनी पूर्वतयारी करत मोठ्या प्रमाणात शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करून कृषी योजनांचा लाभ घ्यावा. मनरेगांतर्गत फळबाग लागवडीत राज्याने ३८ हजार हेक्टरचा उच्चांक गाठला असून, यामध्ये भविष्यात निश्‍चित वाढ होईल. ‘विकेल ते पिकेल’ ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संकल्पना शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम करीत आहे. द्रवरूपात उपलब्ध झालेला नॅनो यूरियामुळे खतांचा अनावश्यक वापर टाळण्यास मदत होणार आहे. या द्रवरुपी युरियामुळे शेतकऱ्यांना चांगला पर्याय उपलब्ध होणार असून, शेतकऱ्यांचे अनुभव बोलके ठरतील. द्रवरूपी यूरियाप्रमाणे डीएपीवर देखील कंपन्यांनी संशोधन करून शेतकऱ्यांना पर्याय उपलब्ध करुन देण्याचे आवाहन त्यांनी केले.

हेही वाचा: कांदा चाळींवर यूरियाचे संकट! विकृतपणामुळे शेतकऱ्यांनी घेतला धसका

एकाच छताखाली पाच कृषी महाविद्यालये साकारणार

श्री. नायकवडी म्हणाले, की मनरेगांतर्गत फळपीक लागवडीत राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत असताना तालुक्यातून मिळणारा अल्प प्रतिसाद आत्मचिंतन करणारा आहे. तालुक्यातील जवळपास ८४ हजार कुटुंब मनरेगांतर्गत फळबाग लागवडीसाठी पात्र असताना कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करून त्यांना प्रवाहात आणण्याचे काम करावे. राज्यभरात सुमारे १५ हजार शेतीशाळा होणार आहेत. एकाच छताखाली पाच कृषी महाविद्यालये हे कृषिमंत्री दादा भुसे यांच्या संकल्पनेतून तालुक्यातील काष्टी परिसरातील २५० हेक्टर क्षेत्रावर साकारण्यात येत असल्याची माहिती देताना डॉ. पवार यांनी दिली. या वेळी शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या सदस्यांना प्रातिनिधिक स्वरूपात खते व बियाणे विक्री परवाने श्री. भुसे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.

हेही वाचा: द्राक्ष उत्पादकांना फसवणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करा - भुजबळ

या वेळी विशेष कार्यकारी अधिकारी रफीक नायकवडी, सुधाकर बोराळे, डॉ. प्रकाश पवार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, विभागीय अधिक्षक कृषी अधिकारी सुनील वानखेडे, आत्माचे प्रकल्प संचालक रवींद्र निकम, बारीपाड्याचे सरपंच चैत्राम पवार, उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे, प्राचार्य विश्‍वनाथ‍ शिंदे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, तंत्रअधिकारी गोकुळ अहिरे, कृषी अधिकारी किरण शिंदे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

(Farming-manufacturing-companies-enrich-farmers-minister-Dada-Bhuse-nashik-agriculture-news)

loading image