राज्यातील १० मंत्री आणि २० आमदारांना कोरोनाची लागण - अजित पवार

Covid-19 Third Wave : नेते मंडळी सुपर स्प्रेडर ठरणार?
DCM Ajit Pawar
DCM Ajit PawarTeam eSakal

कोरोनानंतर (Covid19) आता ओमिक्रॉन (Omicron) या नव्या व्हेरीअंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून (Maharashtra Government) निर्बंध लावले जात आहेत. लग्न सोहळे, राजकीय सभा आणि गर्दीच्या ठिकाणी होणाऱ्या संसर्गामुळे राज्य सरकारने नुकतेच कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र मागच्या काळात झालेल्या राजकीय मंडळींच्या लग्न सोहळ्यांमध्ये अनेकजण कोरोनाबाधित झाले आहेत. याबद्दल बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी धक्कादाय माहिती दिली आहे.

DCM Ajit Pawar
Omicron | 31st नंतर देशात कोरोनाचा उद्रेक, महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण

राज्यात ओमिक्रॉन आणि कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच अजित पवार यांनी दिलेल्या माहितीने चिंतेत भर पडली आहे. शौर्यदिनानिमित्त भिमा-कोरेगाव याठिकाणी उपस्थित असलेल्या अजित पवार यांनी राज्यातील राजकीय मंडळींना कोरोना झाल्याची माहिती दिली. त्यानुसार तब्बल १० मंत्री आणि २० आमदारांना कोरोना झाल्याची माहिती दिली. यातले अनेक आमदार, मंत्री विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात उपस्थित होते. तसेच वेगवेगळ्या लग्न समारंभांना देखील त्यांनी हजेरी लावली होती. या सर्व मंत्री आणि आमदारांच्या संपर्कात हजारो लोक आले असतील. त्यामुळे ही सर्व राजकीय मंडळी कोरोनाचे सुपर स्प्रेडर ठरू शकतात.

DCM Ajit Pawar
लग्नसोहळे 'हॉटस्पॉट' तर सर्वपक्षीय नेते मंडळी 'सुपर स्प्रेडर'

कोरोनाचा संसर्गा झालेल्यांमध्ये राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह काही अन्य काही मंत्री, आमदार आणि दिग्गज राजकीय मंडळींना कोरोनाची लागण झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com