esakal | Maharashtra Rain: 13 जणांचा मृत्यू, मराठवाड्याला मोठा फटका
sakal

बोलून बातमी शोधा

maharshtra rain

Maharashtra Rain: 13 जणांचा मृत्यू, मराठवाड्याला मोठा फटका

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

राज्यात काल (ता.२८) झालेल्या पुरपरिस्थितीचा जोरदार फटका बसला आहे.. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुरामुळे एकूण 13 मृत्यू झाले आहेत. त्यापैकी नाशिक 1, जालना 1, बीड 2, उस्मानाबाद 2, परभणी 2, लातूर 1, बुलढाणा 1, यवतमाळ 3 मृत्यू झाले आहेत. तर 4 जण जखमी झाले आहेत. 205 जनावरांचे या पुरात मृत्यू झाले आहेत.

मराठवाड्याला मोठा फटका

पुराचा मोठा फटका मराठवाड्याला बसला आहे. येथे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, हवामान विभागाकडून राज्यातील नाशिकसह ७ जिल्ह्यांना रेड तर 9 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या असून नागरिकांनाही खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे

हेही वाचा: 'गोव्यात फोडाफोडीचं राजकारण, शिवसेना विधानसभेच्या २२ जागा लढणार'

मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

बदललेल्या हवामानामुळे मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा मुक्काम वाढला आहे. परभणी, नांदेड, बीडमध्ये (Parbhani, Nanded, Beed) पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे अनेक जलसिंचन प्रकल्प पूर्णपणे भरले असून त्यातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. परभणी, हिंगोली, बीड, नांदेडमधील महत्त्वाची धरणे भरली असून त्यातूनही मोठ्या प्रमाणावर पाणी नदीपात्रात सोडले जात आहे. त्यामुळे नदीकाठच्या परिसराला पूरस्थितीचा सामना करावा लागत आहे. मात्र गुलाब चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाल्यामुळे पुढील दोन दिवस मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट (Orange alert for some districts in Marathwada) जारी करण्यात आल्याने पूरस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या पूरसदृश्य परिस्थितीमुळे काही ठिकाणी लोक अडकले होते. मंगळवारी सकाळपासून एकवीस लोकांना वेगवेगळ्या यंत्रणांनी रेस्क्यू ऑपरेशन करून त्यांची सुटका केली. उस्मानाबाद तालुक्यातील दाऊतपूर येथेही आज हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला. या हेलिकॉप्टरचा वापर करून दावतपूर गावातून पाच सहा जणांची सुटका करण्यात आली. यासाठी संरक्षण विभागात हेलिकॉप्टर वापरण्यात आले होते. दाऊतपूरला चारही बाजूने नदीपात्राच्या पाण्याने वेढल्यामुळे हे लोक शेतामध्ये अडकले होते.

हेही वाचा: गुलाबनंतर 'शाहीन' चक्रीवादळाचा धोका, महाराष्ट्र-गुजरातला अलर्ट

नंदुरबार शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता. नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणार्‍या वीर चक्र धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस होत असल्याने पाण्याचा प्रश्न सुटण्याची शक्यता. वैजापूरच्या बोरसरच्या भिंगी गावात एक महिला पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. तलाव फुटल्याने बोरसरमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे

loading image
go to top