नक्षलवाद्यांकडून दोन नागरिकांची हत्या

मनोहर बोरकर
सोमवार, 2 डिसेंबर 2019

उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय हेडरीच्या हद्दीतील पुरसलगोंदी येथील गाव पाटील मासु पुंगाटी (वय 55) व ऋषी मेश्राम (वय 45) दोन नागरिकांची नक्षल्यांनी बंदूकीच्या गोळ्या झाडून हत्या केली आहे.

एटापल्ली (गडचिरोली) : तालुक्यातील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय हेडरीच्या हद्दीतील पुरसलगोंदी येथील गाव पाटील मासु पुंगाटी (वय 55) व ऋषी मेश्राम (वय 45) दोन नागरिकांची नक्षल्यांनी बंदूकीच्या गोळ्या झाडून हत्या केली आहे.

शेतकरी करताहेत 'या' रोपांची शोधाशोध

सुरजागड लोहखनीज उत्खनन कामाला मासु पुंगाटी व ऋषी मेश्राम मदत करत असल्याने त्यांची हत्या केल्याचे बोलले जात आहे. (ता. 1) रविवारी रात्री दरम्यान 30 ते 40 च्या संख्येतील शस्त्रधारी नक्षल पुरसलगोंदी गावात आले. त्यांनी मासु पुंगाटी व ऋषी मेश्राम यांना झोपेतुन उठवून जंगलाच्या दिशेने नेले. नातेवाईकांनी विरोध केला मात्र बंदुकीचा धाक दाखवून दमदाटी करण्यात आली.

Video : पुणे : फुगेवाडी दुर्घटनेतील मजूराचा अखेर मृत्यू

सकाळी दोघांचेही मृतदेह नागरिकांना आढळून आले. नक्षल्यांकडून 2 ते 8 डिसेंबर दरम्यान पीएलजीए सप्ताह पाळून दहशत निर्माण केली जाते. 19 वर्षापूर्वी पीपल्स लिबरेशन गुरीला आर्मी या हिंसक संघटनेची स्थापना करण्यात आली होती. दरम्यान या संघटनेच्या कारवायात अनेक राजकीय पुढारी, पोलिस अधिकारी, कर्मचारी व सामान्य नागरिकांचे बळी घेतले गेले आहेत. अशाच मासु पुंगाटी व ऋषी मेश्राम याचे झालेल्या हत्यामुळे तालुक्यात दहशत पसरली आहे. घटनेचा पुढील तपास हेडरी पोलिसांकडून केला जात असून नक्षल विरोधी शोध मोहीम तीव्र करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 2 dies in Naxalite attacks in Etapalli