धक्कादायक! शाळेत मध्यान्ह भोजनात आढळला सरडा; 40 विद्यार्थ्यांना विषबाधा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Food Poisoning

धक्कादायक! शाळेत मध्यान्ह भोजनात आढळला सरडा; 40 विद्यार्थ्यांना विषबाधा

उस्मानाबाद जिल्ह्यातील एका प्राथमिक शाळेत (Primary School) विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनात सरडा (Lizard) आढळून आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. शाळेत पोषण आहार म्हणून दिल्या जाणाऱ्या खिचडीत सरड्याचे तुकडे आढळले. ही खिचडी खाल्ल्यानंतर 40 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा (Poisoning) झाली आहे. (40 students of at primary school in osmanabad affected by food poisoning)

हेही वाचा: कारागृहातील कैद्यांना मिळणार ५० हजारांपर्यंत कर्ज

ही घटना उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा (Umarga) तालुक्यात पेठसावंगी (Pethasawangi) येथील असून मंगळवारी सकाळी उघडकीस आली.

शाळेत मिळालेली खिचडी विद्यार्थ्यांनी डब्यात भरून घरी नेली होती. त्यानंतर एका विद्यार्थ्याच्या डब्यात सरड्याचे डोके तर दुसऱ्या विद्यार्थ्याच्या डब्यात सरड्याचा तुकडे आढळून आला. खिचडीमध्ये सरडा सापडल्याची माहिती मिळताच पालकांनी शाळा प्रशासनाला माहिती दिली. मात्र तोपर्यंत अनेक विद्यार्थ्यांची प्रकृतीही ढासळू लागली. तात्काळ डॉक्टरांना बोलवण्यात आले तर तब्बल 40 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

हेही वाचा: विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र तापणार

ही खिचडी सुमारे 248 जणांना वाटण्यात आली होती . मात्र त्याचा फटका केवळ 40 विद्यार्थ्यांनाच बसला.

या विद्यार्थ्यांना नांगरवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असून 18 विद्यार्थ्यांना रुग्णवाहिकेतून उमरगा येथे उपचारासाठी नेण्यात आले. ज्या विद्यार्थ्यांना सौम्य लक्षणे दिसत आहेत त्यांना शाळेतीलच एका खोलीत त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.

Web Title: 40 Students Of At Primary School In Osmanabad Affected By Food Poisoning

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..