लाडक्या बहिणींना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत! राज्य सरकारने 35 महिन्यांत महामंडळाला दिले 5080 कोटी रुपये, 3 वर्षांत 171.60 कोटी महिलांचा सवलतीत प्रवास

महायुती सरकारने ७५ वर्षांवरील वृद्धांना अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेतून मोफत बस प्रवास देणारी योजना आणली. ६० वर्षांवरील ज्येष्ठांना अर्धे तिकीट ठेवले. त्यांच्याबरोबरच राज्यातील लाडक्या बहिणींना तथा महिलांना देखील तिकीट दरात ५० टक्के सवलत दिली.
Ladki Bahin

Ladki Bahin

sakal 

Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनंतर महायुती सरकारने एसटी बसगाड्यांमधून प्रवास करणाऱ्या महिलांसाठी तिकीट दरात ५० टक्के सवलतीची योजना जाहीर केली. विधानसभा, नगरपालिका, महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत या दोन्ही योजना महायुतीसाठी गेमचेंजर ठरल्या. तिकीट दरात सवलत देण्यासाठी राज्य सरकारने मागील ३५ महिन्यांत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला तब्बल पाच हजार ८० कोटी रुपये मोजले आहेत.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात आता दरवर्षी दोन हजार नव्या गाड्या दाखल होत आहेत. इलेक्ट्रिक बस देखील सेवेत दाखल झाल्या आहेत. जुनाट बस आता महामंडळाच्या ताफ्यात नसल्याने प्रवाशांची संख्या वाढल्याने चार-पाच वर्षांच्या तुलनेत आता परिवहन महामंडळाची स्थिती सुधारू लागली आहे. महायुती सरकारने ७५ वर्षांवरील वृद्धांना अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेतून मोफत बस प्रवास देणारी योजना आणली.

६० वर्षांवरील ज्येष्ठांना अर्धे तिकीट ठेवले. त्यांच्याबरोबरच राज्यातील लाडक्या बहिणींना तथा महिलांना देखील तिकीट दरात ५० टक्के सवलत दिली. सध्या खासगी वाहनांची संख्या वाढत असताना देखील लालपरीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची विशेषत: महिलांची संख्या मोठी आहे. या लाभार्थींनी विधानसभा निवडणुकीबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्वाधिक पसंती भाजप व त्यापाठोपाठ शिवसेनेला पसंती दिल्याचे निकालातून दिसून आले.

तिकीट सवलत योजनेची स्थिती

  • योजनेची सुरवात

  • १७ मार्च २०२३

  • तिकीट दरात सवलत

  • ५० टक्के

  • आतापर्यंत महिलांचा प्रवास

  • १७१.६० कोटी

  • शासनाकडून महामंडळाला रक्कम

  • ५०८०.४३ कोटी

दरमहा १४५ कोटींची सवलत

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसगाड्यांमधून दरमहा सरासरी साडेचार कोटी लाडक्या बहिणी प्रवास करतात. तिकीट दरात ५० टक्के सवलतीच्या माध्यमातून राज्य शासनाने परिवहन महामंडळाला दरमहा सरासरी १४५ कोटी रुपये दिले आहेत.

महिला प्रवाशांची संख्या वाढली

राज्यातील महिलांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करताना तिकिटात ५० टक्के सवलत आणि अन्य योजनांमुळे एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. परिवहन महामंडळाची आर्थिक स्थिती देखील सुधारली आहे.

- अमोल गोंजारी, विभागीय व्यवस्थापक, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com