esakal | देशात 75 हजार हेक्टरवर औषधी वनस्पतींची लागवड होणार
sakal

बोलून बातमी शोधा

75,000 hectares of medicinal plants will planted in India

देशात 75 हजार हेक्टरवर औषधी वनस्पतींची लागवड होणार

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : आयुष मंत्रालयाचे (Ministry of AYUSH) राष्ट्रीय औषधी वनस्पती (Herbs) मंडळ देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात 75 हजार हेक्टरवर वनौषधींची लागवड करणार आहे. त्याची सुरवात पुणे आणि सहारणपूर (उत्तर प्रदेश) येथून झाली. अभियानातंर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना साडेसात हजार आणि उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना 750 वनौषधींचे वाटप करण्यात आले.

वनौषधीची लागवड करणाऱ्यांचा सत्कार

पुण्यामधील कार्यक्रमात शेतकऱ्यांना औषधी वनस्पतींचे वाटप करण्यात आले. आधीपासून वनौषधीची लागवड करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. पारनेर (जि. नगर) येथील आमदार नीलेश लंके, युनानी औषध केंद्रीय संशोधन परिषदेचे (CCRUM) महासंचालक डॉ. असीम अली खान, राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाचे (National Board of Medicinal Plants) उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चंद्रशेखर संवल उपस्थित होते.

हेही वाचा: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ घ्या - कृषि अधिकारी

''औषधी वनस्पती आणि त्यांची लागवड या क्षेत्रात मोठी क्षमता आहे. 75 हजार हेक्टरवर वनौषधींची लागवड केल्याने देशात औषधांची उपलब्धता सुनिश्चित होऊन शेतकऱ्यांना उत्पन्नाचा मोठा स्त्रोत ठरणार आहे. गेल्या दीड वर्षात औषधी वनस्पतींची बाजारपेठ देशाप्रमाणे जगात विस्तारली. त्यामुळे अश्वगंधा अमेरिकेतले सर्वाधिक विक्रीचे तिसरे उत्पादन ठरले आहे.'' - सर्वानंद सोनोवाल, केंद्रीय आयुषमंत्री

हेही वाचा: ढोबळ्या मिरचीला 2 रुपये भाव; शेतकऱ्याने सगळी रोपे उपटली

loading image
go to top