धक्कादायक! नऊ वर्षांच्या मुलाकडून चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार | Child Sexually abused in Ulhasnagar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rape crime
POSCO: 9 वर्षाच्या मुलाचा साडेचार वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार

धक्कादायक! नऊ वर्षांच्या मुलाकडून चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार

एका 9 वर्षांच्या मुलाने साडेचार वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. घराशेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलाने पीडित मुलीला खेळण्याच्या बहाण्याने घराच्या मागच्या बाजूला नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीनंतर संबंधित मुलावर ठाण्यातील विठ्ठलनंतर पोलीस स्टेशनमध्ये पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित अल्पवयीन मुलगी कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुटूंबासह राहते. तिच्याच शेजारी नऊ वर्षाचा मुलगा राहत असून त्याने तीन एप्रिलला दुपारच्या सुमारास खेळण्याच्या बहाण्याने पीडित मुलीला घराच्या मागच्या बाजूला नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. (A 9-year-old boy raped a four-and-a-half-year-old girl, In Ulhasnagar, Maharashtra)

हेही वाचा: पाणी हवे असे म्हणत घरात घुसला; पुण्यात मुलीवर बलात्कार

पीडित मुलीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये दुखत असल्यामुळे आईनं तिच्याकडे चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यानंतर १५ एप्रिलला पीडितेच्या आईने विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन शेजारी राहणाऱ्या नऊ वर्षाच्या अल्पवयीन मुलाविरोधात तक्रार दिली. संबंधित मुलावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक चौधरी यांनी दिली.

हेही वाचा: अल्पवयीन मुलीच्या बलात्कार-हत्या प्रकरणात सीबीआयकडून पहिली अटक

3 एप्रिल रोजी खेळण्याच्या बहाण्याने मुलाने मुलीला एका निर्जन ठिकाणी नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार पीडितेच्या आईनं विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात केली असून आयपीसी कलम 376 (बलात्कार) आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (Pocso) कायद्यान्वये संबंधित मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. आरोपी मुलाला अद्याप ताब्यात घेण्यात आलेले नाही, असंही पोलीसांनी सांगितले.

Web Title: A 9 Year Old Boy Raped A Four And A Half Year Old Girl In Ulhasnagar Maharashtra

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..