आदित्य ठाकरे आज विदर्भ दौऱ्यावर

नागपूर जिल्ह्यातील वीज प्रकल्पांचे प्रदूषण आणि फ्लाय अ‍ॅशच्या प्रश्नावर आढावा घेणार.
Aaditya Thackeray
Aaditya Thackerayटिम ई सकाळ
Updated on

राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदीत्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे ७ आणि ८ फेब्रुवारी अशा दोन दिवसांच्या विदर्भ (Vidarbha) दौऱ्यावर आहे. हा कुठलाही राजकीय दौरा नाही तर या दौऱ्यादरम्यान ते चंद्रपूर (Chandrapur)मधील तलावाबाबत पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदलाची पाहणी आणि नागपूर जिल्ह्यातील वीज प्रकल्पांचे प्रदूषण आणि फ्लाय अ‍ॅशच्या प्रश्नावर आढावा घेणार आहे.

आदित्य ठाकरे सोमवारला दुपारी २ च्या सुमारास विशेष विमानाने नागपूर (Nagpur) येथे येणार त्यानंतर कारने ते चंद्रपूरला रवाना होतील. चंद्रपुरच्या रामाळा तलावास ते भेट देणार आहेत तर बगड खिडकी, चांदा किल्ला येथे स्वच्छता अभियानाची ते पाहणी करतील. चंद्रपुर जिल्ह्यातील पर्यटनाबाबत आढावा बैठक घेतल्यानंतर रात्री नागपूरला परत येतील.

Aaditya Thackeray
लता दीदींचं निधन; पंतप्रधान मोदींची सभा रद्द

कोराडी व खापरखेड औष्णिक वीज केंद्रातून मोठ्या प्रमाणात तयार होणाऱ्या प्लाय अ‍ॅशची विल्हेवाट लावण्याचा खुप मोठा प्रश्न आहे. कोराडी व खापरखेड्याच्या प्रदूषणाचा मुद्दा मध्यंतरी बराच गाजला होता. याविषयी आदित्य ठाकरे मंगळवारी आढावा घेणार. या परीसरात प्रदूषणापासून दिलासा देण्यासाठी पर्यावरण व ऊर्जा विभागाकडून संयुक्त योजना कार्यान्वित करण्याचा विचार आदीत्य ठाकरे बोलून दाखवण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com