

Actor Ajay Devgn in High Court over Vimal Pan Masala ad case.
Sakal
महाराष्ट्रात बंदी असलेल्या 'विमल पान मसाला' आणि इलायचीच्या सरोगेट जाहिरातीचे प्रकरण आता थेट मुंबई उच्च न्यायालयात पोहोचले आहे. अन्न व औषध प्रशासनाने (FDA) बजावलेल्या कारणे दाखवा नोटीसविरोधात बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता अजय देवगण याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे. मात्र, अभिनेता न्यायालयात गेला असला तरी एफडीए आपली कारवाई अजिबात रोखणार नाही, असा सज्जड दम एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.